Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: दिवाळीच्या आठवडाभरापूर्वीच सोन्याने उच्चांक गाठला; १० तोळ्यामागे ३२०० रुपयांनी वाढ; वाचा सविस्तर

Gold Rate Today 13th October 2025: दिवाळीच्या आधी सोन्याला झळाली आली आहे. आज सोन्याचे दर वाढले आहे. प्रति तोळ्यामागे ३२० रुपयांनी वाढ झाली आहे.

Siddhi Hande

दिवाळीआधी सोन्याचे दर वाढले

सोन्याच्या दराने उच्चांक गाठला

प्रति तोळ्यामागे ३२० रुपयांची वाढ

ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. आजदेखील सोन्याचे वाढले आहेत.. आज सोन्याच्या दरात ३२० रुपयांनी वाढ झालेली दिसत आहे. सोन्याचे १० तोळ्यामागे ३२०० रुपयांनी वाढले आहेत. सोन्याचे दर वाढल्याने सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे.

अवघ्या ७-८ दिवसांवर दिवाळी आहे. त्यात दिवाळीत सणासुदीच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ असे मानले जाते. त्यामुळे दरवर्षी अनेकजण हा मूहूर्त साधत सोने खरेदी करतात. मात्र, यंदा सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे यंदा सोने खरेदी कमी होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचे दर ४०,००० रुपयांनी वाढले आहे. दरम्यान, आजचे सोन्याचे दर वाचा.

आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today)

आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात तोळ्यामागे ३२० रुपयांनी वाढ झाली असून हे दर १,२५,४०० रुपये झाले आहेत. ८ग्रॅम सोन्याचे दर २५६ रुपयांनी वाढले असून हे दर १,००,३२० रुपये झाले आहेत. दर १० तोळ्यामागे ३२०० रुपयांनी वाढ झाली आहे.

२२ कॅरेटचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,१४,९५० रुपये झाले आहे. ८ ग्रॅमचे दर २४० रुपयांनी वाढून ९१,९६० रुपये झाले आहे. १० तोळे सोन्याच्या दरात ३००० रुपयांनी वाढ होऊन ते ११,४९,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

१८ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील चांगलीच वाढ झाली आहे. १ तोळ्यामागे २४० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर ९४,०५० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे १९२ रुपयांनी वाढ झाली असून हे दर ७,२४० रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे २,४०० रुपयांची वाढ झाली असून हे दर ९,४०,५०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खेडशिवापूर टोलनाक्याजवळ कंटेनरला लागली आग

Amitabh Bachchan: 'मला नियम समजावू नका...'; १० वर्षाच्या मुलाने अमिताभ बच्चन यांचा केला अपमान

Diwali Good Luck: दिवाळीत करा हे ५ सोपे वास्तु उपाय, सुख - समृद्धीसह, लक्ष्मी येईल घरात

Bhaubeej Gift : यंदाची भाऊबीज कायम राहील लक्षात, भावंडांना द्या टेक-फ्रेंडली गिफ्ट्स

Gold Silver Price : दिवाळीआधी चांदीच्या दरातही रेकॉर्डब्रेक वाढ, जाणून घ्या सोने-चांदीचे नवे दर

SCROLL FOR NEXT