GOLD AND SILVER PRICES SURGE AGAIN; SILVER JUMPS ₹13,000 IN TWO DAYS Saam Tv
बिझनेस

Gold Rate : सुवर्ण बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ, चांदी ८००० रुपयांनी महागली; वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

Jalgaon Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ. चांदी दोन दिवसांत तब्बल १३ हजारांनी महागली असून सोन्याच्या दरातही दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे.

Alisha Khedekar

  • सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ

  • चांदी अवघ्या दोन दिवसांत १३ हजार रुपयांनी महागली

  • लग्नसराईमुळे सुवर्ण बाजारात तेजी वाढली

  • गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सोने-चांदीकडे वाढला

संजय महाजन, जळगाव

सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला किंमतींमध्ये घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले असून, सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. आज सोन्याच्या दरात तब्बल दीड हजार रुपयांची वाढ झाली, तर चांदीच्या दरात तब्बल ८ हजार रुपयांची उसळी पाहायला मिळाली.

जळगावातील सुवर्ण बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात उलाढाल सुरू आहे. लग्नसराईचा हंगाम, आगामी सण-उत्सव जवळ आल्याने ग्राहकांचा कल पुन्हा सोने-चांदी खरेदीकडे वाढताना दिसत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, जागतिक बाजारातील बदल, डॉलरच्या किंमतीतील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांची वाढती मागणी यामुळे मौल्यवान धातूंच्या किंमती वाढत आहेत.

विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांत चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. बुधवारी चांदीच्या भावात ५ हजार रुपयांची वाढ झाली होती, तर आज पुन्हा ८ हजार रुपयांची भर पडली. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत चांदी तब्बल १३ हजार रुपयांनी महागली आहे. सोन्याच्या दरातही बुधवारी २ हजार २०० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आज आणखी दीड हजार रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे.

दरम्यान, १७ मेपासून अधिक मासाला सुरुवात होत आहे. हिंदू संस्कृतीत अधिक मासात सोने-चांदी खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे आगामी काळात सुवर्ण बाजारात आणखी तेजी येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरवाढीमुळे ग्राहक संभ्रमात असले तरी गुंतवणुकीसाठी अनेक जण अजूनही सोने-चांदीकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रेडिशनल आणि मॉडर्न, दोन्ही लूकवर उठून दिसतील असे 5 मंगळसूत्र

LPG Price Hike : सामान्यांच्या खिशाला पुन्हा झटका? LNG महागलं, आता LPG सिलिंडरचेही दर वाढण्याचे संकेत

Railway track ballast: ट्रेनच्या रुळांखाली खडीसारखे दगड का असतात? यामागचं कारण ऐकून व्हाल थक्क!

Maharashtra News Live Update: बीड- दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याने केला हल्ला

Mumbai : मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; सागर माळीचे ३८व्या वर्षी निधन

SCROLL FOR NEXT