सुवर्ण बाजारात सोन्याच्या दरात उसळी
आज १ तोळा सोन्याचे दर ३३३० रुपयांनी वाढले
२४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १,५५,३५० रुपये झाला
अमेरिकन डॉलर आणि बाँड यील्डमधील घसरणीचा सोन्याच्या किमतीवर परिणाम
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी नागरिकांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरज असेल तरच सोने खरेदी करण्याचे आवाहन केले. दरम्यान, गेल्या चार ते पाच दिवसांपासून घसरणाऱ्या सुवर्ण बाजारात आता तेजी पाहायला मिळत आहे. अमेरिकन डॉलर आणि बाँड यील्डमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला असून, दरात सातत्याने वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा १ तोळ्याचा भाव १,५५,३५० रुपयांवर पोहोचला आहे. या दरात तब्बल ३,३३० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे १० तोळे सोन्याच्या किमतीत ३३,३०० रुपयांची वाढ झाली आहे.
सोन्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे नागरिकांना घाम फुटला आहे. विशेषतः लग्नसराई किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे सोन्याची खरेदी करण्यापूर्वी आजचे २२ कॅरेट, २४ कॅरेट आणि १८ कॅरेटचे ताजे दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. बाजारातील बदलांनुसार सोन्याच्या किमतीत पुढील काळातही चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
१ ग्रॅम: आजचे दर १५,५३५
८ ग्रॅम: आजचे दर १,२४,२८०
१० ग्रॅम: आजचे दर १,५५,३५०
१०० ग्रॅम: आजचे दर १५,५३,५००
१ ग्रॅम: आजचे दर १४,२४०
८ ग्रॅम: आजचे दर १,१३,९२०
१० ग्रॅम: आजचे दर १,४२,४००
१०० ग्रॅम: आजचे दर १४,२४,०००
१ ग्रॅम: आजचे दर ११,६५१
८ ग्रॅम: आजचे दर ९३,२०८
१० ग्रॅम: आजचे दर १,१६,५१०
१०० ग्रॅम: आजचे दर ११,६५,१००
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.