Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी सोन्याचे दर ५००० रुपयांनी वाढले; वाचा आजचे भाव

Gold Price Today 26th August 2025: उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. १० तोळ्यामागे तब्बल ५००० रुपयांनी वाढ झाली आहे.

Siddhi Hande

ऐन गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याच्या दरात जवळपास ५५० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या गणेशोत्सवात अनेकजण सोने खरेदी करतात. ज्यांच्या घरात गणपती बसतात ते गणपती बाप्पाासाठी सोने खरेदी करतात. परंतु आता सोन्याचे भाव १ लाख २ हजारांपेक्षा जास्त झाले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न विचारला जात आहे.

सोन्याच्या दरात वाढ

सोन्याच्या दरात आज प्रति तोळ्यामागे ५५० रुपयांची वाढ झाली आहे. गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी सोन्याचे दर वाढल्याने पुढचे काही दिवस हे दर अजून वाढण्याची शक्यता आहे. जाणून घ्या सोन्याचे आजचे दर

२४ कॅरेट सोन्याचे दर

आज २४ कॅरेट सोन्याचे दर १,०२,०६० रुपये आहेत. या दरात ५५० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८१,६४८ रुपये आहेत या दरात ४४० रुपयांनी वाढ झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर ५,५०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ०,२०,६०० रुपये आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर ५०० रुपयांनी वाढले आहेत. प्रति तोळा सोन्याचे दर ९३,५५० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७४,८४० रुपये आहेत. या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे.१० तोळा सोन्याचे दर ९,३५,५०० रुपये आहेत. या दरात ५००० रुपयांनी वाढ झाली आहे.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर ४१० रुपयांनी वाढले आहेत. हे दर आज ७६,५०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६१,२४० रुपये झाले आहे. या दरात ३२८ रुपयांनी वाढ झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर ४,१०० रुपयांनी वाढले असून ७,६५,५०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT