Jalgaon Gold and Silver Price Today meta ai
बिझनेस

Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या किंमतीत पुन्हा मोठी घसरण

Gold and Silver Rate 25 November 2026 : लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव मोठी घसरण झाली आहे.

Sakshi Sunil Jadhav

लग्नसराईची लगबग सुरू झाली असतानाच सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सर्वसामान्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी असेल. कारण आज दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी जळगावच्या सराफा बाजारात पुन्हा सोन्याचा भाव ३५०० रुपयांनी, तर चांदीचा भाव तब्बल ८००० रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणं सर्वसामान्यांसाठी सोपं झालं आहे.

आज सराफा बाजारातील सोन्याच्या भाव १,२३,००० रुपये आहे. यामध्ये ३५०० रुपयांनी घसरण झाली आहे. तर चांदीचा आजचा भाव १,४९,००० रुपये आहे. यामध्ये तब्बल ८,००० रुपयांनी घसरण झालेली आहे. ही घसरण आणखी वाढत राहील की कमी होईल याकडे सर्व ग्राहकांचं लक्ष लागलं आहे. दिवाळीच्या दिवसांमध्येही सोन्याच्या किंमतीत घसरण झाली होती. तेव्हा नागरिकांनी सोनं-चांदी खरेदी करणं पसतं केलं.

तसेच GoodReturn नुसार, मुंबई- पुण्यात आज २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव १२, ४५८ रुपये आहे. २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ११,४२० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ९,३४४ रुपये इतके आहे. तर १ ग्रॅम चांदी १६५ रुपये असून १ किलो चांदीचा भाव १,६५,००० रुपये इतका आहे.

पुढे आपण २४,२२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या किमती पाहणार आहोत.

२४ कॅरेट १ तोळा सोनं - १,२४,५८०

२२ कॅरेट १ तोळा सोनं - १,१४,२००

१८ कॅरेट १ तोळा सोनं - ९३,४४०

सध्या ग्राहक सोनं-चांदीच्या किंमतीत आणखी घसरण होण्याची वाट पाहतायेत. गेल्या काही दिवसांची घसरण पाहता ग्राहक सोनं-चांदी खरेदी करणं पसंत करतायेत. पुढे आणखी घसरण होईल अशी शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त यादीत कागल-करवीरचा समावेश करण्यासाठी शेतकऱ्यांचा कावड मोर्चा!

ऐन दुष्काळात सोलापूरकरांसाठी मोठी गुड न्यूज! १,३५० कोटींचा निधी मंजूर, पाणीप्रश्न सुटणार?

कल्याण-नवी मुंबईचा प्रवास सुसाट होणार, ऐरोली कॉरिडॉरचे काम अंतिम टप्प्यात, या भागातील वाहतूककोंडी फुटणार

Pune FDA : हार्ट अटॅक, बीपी आणि डायेबटीजची औषधं बनावट; पुण्यातील प्रसिद्ध कंपनीवर तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई

Health Tips : सतत तहान, थकवा अन् अचानक वजन कमी होतेय? ही लक्षणे चुकूनही दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT