Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: सोन्याचे दर १०,४०० रुपयांनी वाढले; १० तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold Rate Today 23rd July 2025: सध्या सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याचे दर प्रति तोळा १०४० रुपयांनी वाढले आहेत. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न पडला आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दरात गेल्या अनेक दिवसांपासून चढ उतार होत आहेत. सोन्याचे दर १ लाखांच्या पार गेले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. पुढच्या महिन्यापासून सणासुदीचे दिवस सुरु होत आहेत. त्यामुळे अनेकजण सोने खरेदी करतात. परंतु सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सोने खरेदी की नाही, असा प्रश्न पडला आहे.

सोने खरेदी करणे ही एक प्रकारची गुंतवणूक आहे. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. भविष्यातही दे दर स्थिर राहतील किंवा वाढतच जातील.त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. दरम्यान आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे १,०४० रुपयांनी वाढ झाली आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात १०४० रुपयांनी वाढ झाली आहे. आज सोन्याचे दलर १,०२,३३० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याच्या दरात ८३२ रुपयांनी वाढ होऊन हे दर ८१,८६४ रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर १०,२३,३०० रुपये झाले आहेत. या दरात १०,४०० रुपयांनी वाढ झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

२२ कॅरेट सोन्याचे दर ९५० रुपयांनी वाढले आहे. १ तोळा सोन्याचे दर ९३,८०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७५,०४० रुपये आहेत. या दरात ७६० रुपयांनी वाढ झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर ९,३८,००० रुपये आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर ७६,७५० रुपये प्रति तोळा आहेत. हे दर ७८० रुपयांनी वाढले आहेत.८ ग्रॅम सोन्याचे दर ६१,४०० रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ७,६७,५०० रुपये आहेत. या दरात ७,८०० रुपयांनी वाढ झाली आहे.

चांदीचे दर (Silver Rate)

आज चांदीच्या दरात थोडी वाढ झाली आहे. आज १० ग्रॅम चांदीचे दर १,१९० रुपये आहेत. १०० ग्रॅम चांदीचे दर ११,९०० रुपये आहेत. चांदीचे दर गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : भयंकर! १४ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली, दोघांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणात आरोपी भीमरावविरोधात आरोप निश्चित

Manoj Jarange Patil: उष्माघातानं जीव गेला तर जाऊ दे! सरकार जबाबदार असेन; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

Heatwave in India: उष्णतेचा कहर वाढला! डॉक्टरांनी दिला हीट स्ट्रोक आणि डिहायड्रेशनपासून बचावाचा गंभीर इशारा

महागड्या गोळ्या-औषधं खाणं टाळा! शरीरातील रक्त वाढवण्यासाठी खा 'ही' ५ फळे

SCROLL FOR NEXT