
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज पुन्हा सोनं आणि चांदीचे दर वाढले आहे. एक तोळा सोनं जीएसटीसह १ लाखांपार गेले आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,१४० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आणखी कात्री लागली आहे. आज सोनं आणि चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी किती दर आहेत ते घ्या जाणून...
गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,१४० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला तब्बल १, ०१,२९० रुपये खर्च करावे लागणार आहेत. काल हेच सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,००,१५० रुपये द्यावे लागले. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात आज ११,४०० रुपयांनी वाढ झाली आहे. म्हणजे आज तुम्हाला १० तोळे सोनं खरेदी करण्यासाठी १०,१२,९०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.
आज २२ कॅरेट १ तोळा सोन्याच्या दरात १,०५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९२,८५० रुपये खर्च करावे लागणार आहेत. काल हेच सोनं ९१,८०० रुपयांना मिळत होते. तर २२ कॅरेटचे १० तोळे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ९,२८,५०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज वाढ झाली आहे.
१८ कॅरेटचे १ तोळा सोन्याच्या दरात आज ८६० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला आज ७५,९७० रुपये द्यावे लागणार आहेत. काल याच सोन्याचे दर ७५,११० रुपये इतके होते. तर हेच १० तोळे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ७,५०,७०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. आज भारतात चांदीचे दर देखील वाढले आहेत. १ ग्रॅम चांदीमध्ये २ रुपयांनी वाढली असून याचा दर ११८ रुपये झाला आहे. तर १ किलो चांदी २००० रुपयांनी महागली आहे. आज १ किलो चांदीचा दर १,१८,०० रुपये इतक झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.