सोन्याचे दर पुन्हा वाढले
सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे १८६० रुपयांची वाढ
आजचे सोन्याचे भाव वाचा
सध्या लग्नसराईच्या दिवसात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होते. मात्र, सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून चढ-उतार होताना दिसत आहे. मागच्या आठवड्याभरात सोन्याचे दर स्वस्त झाले होते. त्यानंतर आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १८०० रुपयांनी वाढले आहेत. सोन्याचे दर पुन्हा वाढल्याने ग्राहकांच्या मनात मात्र सोन्याच गुंतवणूक करायची की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. सोन्याचे दर आज १ लाख २५ हजारांपेक्षा जास्त झाले आहेत.
२४ कॅरेटचे दर (24k Gold Rate)
आज २४ कॅरेट सोन्याचे दर १,२५,८४० झाले आहेत. या दरात १८६० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅममागे १४८८ रुपयांची वाढ झाली असून हे दर १,००,६७२ रुपये झाले आहेत. १० तोळा सोन्याचे दर १२,५८,४०० रुपये झाले आहेत. हे दर १८,६०० रुपयांनी वाढले आहेत.
२२ कॅरेटचे दर (22k Gold Rate)
आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,७०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,१५,३५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १३६० रुपयांनी वाढले असून ते ९२,२८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १७००० रुपयांनी वाढले आहेत. हे दर सध्या ११,५३,५०० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेटचे दर
आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,३९० रुपये आहेत. हे दर सध्या ९४,३८० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १,११२ रुपयांनी घसरले असून ते ७५,५०४ आहेत.१० तोळ्यामागे १३९०० रुपयांची वाढ झाली असून हे दर ९,४३,८०० रुपये झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.