Gold Rate Today: ऐन लग्नसराईत सोन्याला उतरती कळा; आठवड्याच्या पहिल्या दिवशी २२ अन् २४ कॅरेटचे भाव किती? वाचा

Gold Rate Today Drop: सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण झाली आहे. मागील आठवडाभर सोन्याचे दर कमी होत होते. त्यानंतर आजदेखील सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary

सोन्याचे दर पुन्हा घसरले

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर १००० रुपयांनी घसरले

ऐन लग्नसराईत सोन्याच्या किंमती कमी झाल्या

सोनं घेणे ही एक गुंतवणूक मानली जाते. सध्या सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. अशातच मध्यमवर्गीय सोन्याचे दर कमी होण्याची वाट पाहत आहेत. सोन्याचे दर हे सव्वा लाखांच्या घरात असल्याने सर्वसामान्य लोक सोने घेण्याचा विचारदेखील करु शकत नाही. दरम्यान, आता मागील काही आठवड्यात सोन्याचे दर पुन्हा घसरले आहेत. मागच्या आठवड्यात सोन्याचे दर घसरलेले पाहायला मिळाले. त्यानंतर आता पुन्हा सोन्याचे दर घसरले आहेत.

Gold Rate Today
Gold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे दर घसरत असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज १० तोळ्यामागे १,१०० रुपयांची घसरण झाली आहे. जर तुम्हालाही सोनं खरेदी करायचे असेल तर आजचे दर वाचा.

Gold Rate Today
Gold Rate Prediction: महत्त्वाची बातमी! सोन्याचे दर २५,००० रुपयांनी वाढणार; तज्ज्ञांनी दिली माहिती

आजचे सोन्याचे दर (Today Gold Rate)

२४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ११० रुपयांनी घसरले असून हे दर १,२४,९७० रुपये झाले आहेत. ८ग्रॅम सोन्याचे दर आज ९९,९७६ रुपये आहेत.१० तोळ्यामागे सोन्याचे दर १,१०० रुपयांनी घसरले असून हे दर १२,४९,७०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर १०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर सध्या १,१४,५५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ९१,६४० रुपयांवर विकले जात आहे. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १००० रुपयांनी घसरुन ११,४५,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोनं प्रति तोळ्यामागे ९३,७३० रुपयांवर विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७४,९८४ रुपये आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ९,३७,३०० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold New Rates : सोनं ८००० रूपये झालं स्वस्त, गेल्या आठवड्यात अचनाक दर आपटले

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com