गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशातच १८ नोव्हेंबर रोजी सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाली आहे. जळगावात सोन्याच्या दरात तब्बल २ हजार ८०० रुपयांची, तर चांदीच्या दरात ४ हजार रुपयांची घट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सोनं जळगावच्या सराफा बाजारात २८०० रुपयांनी स्वस्त झालं. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ही १३२००० रुपये आहे. सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे बाजारात खरेदीदारांचं लक्ष परत सोन्याकडे वळले आहे. लग्नसराई, सणासुदीचे दिवस किंवा भविष्यासाठी गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची घडामोड आहे. पण सोन्याचे दर आणखी खाली येण्याची शक्यता असल्याची चर्चा बाजारात सुरू असल्याने अनेक ग्राहक सध्या खरेदी करावी की आणखी काही दिवस वाट पाहावी, या संभ्रमात आहेत.
सोन्याबरोबरच चांदीच्या किंमतीतही ४ हजार रुपयांची घट झाली. १ किलो चांदीची किंमत १६९००० रुपये आहे. चांदी स्वस्त झाल्यामुळे दागिने, भेटवस्तू आणि गुंतवणुकीसाठी चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळू शकतो. गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरातही चढ-उतार पाहायला मिळत असल्याने पुढच्या हालचालींकडे ग्राहकांचं लक्ष आहे.
सोनं-चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांसमोर खरेदीची संधी निर्माण झाली. पण दर आणखी घसरतील की पुन्हा वाढतील, याबद्दल निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे खरेदी करण्याआधी स्थानिक सराफा बाजारातले दर तपासणं महत्त्वाचं आहे. तसेच दागिने खरेदी करताना जीएसटी, मेकिंग चार्जेस आणि हॉलमार्कची माहितीही घ्यावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.