पश्चिम द्रुतगती महामार्गावर स्टंटबाजी करणाऱ्या पाच जणांना अटक; अंधेरी पोलिसांची कारवाई, पाच दुचाकी जप्त!

Andheri Police Crack Down on Rash Driving : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर जीवघेणी स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही धडक कारवाई करत गुन्हा दाखल केला असून पाचही दुचाकी जप्त केल्या आहेत.
Stunt Riding Lands 5 Youths Behind Bars in Andheri
Stunt Riding Lands 5 Youths Behind Bars in Andherisaam tv
Published On: 

मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दुचाकीवरून स्टंटबाजी आणि रेसिंग करून धुमाकूळ घालणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. हे तरुण दर शनिवारी रात्री महामार्गावर बाईक रेसिंग आणि धोकादायक स्टंट करत असल्याचे समोर आले आहे. या स्टंटबाजीचे व्हिडिओ तयार करून ते इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर रील्सच्या माध्यमातून व्हायरल केले जात होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून पश्चिम द्रुतगती महामार्गावर भररस्त्यात दुचाकींच्या साहाय्याने वेगवेगळे धोकादायक स्टंट केले जात होते. यासाठी रस्त्यावरील वाहतूक रोखून इतर वाहनचालकांनाही अडथळा निर्माण केला जात असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, दुचाकींना मॉडिफाइड सायलेन्सर बसवून मोठ्या आवाजात रेसिंग आणि स्टंटबाजी केली जात होती. या संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केले जात होते.

Stunt Riding Lands 5 Youths Behind Bars in Andheri
जन्मदाताच बनला मुलांचा वैरी! चॉकलेटचे आमिष दाखवून दोन चिमुकल्यांना कालव्यात फेकले; छत्रपती संभाजीनगर हादरले

या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच आरोपींना अटक केली आहे. जावेद रफीक मालदार (वय २५), मोहसीन मुबारक शेख (वय १९), फैजल अहमद खान (वय २२), सोहेल मोहम्मद सिराज (वय २९) आणि कुशल भिसे (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी मालाड, पठाणवाडी आणि विरार परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

Stunt Riding Lands 5 Youths Behind Bars in Andheri
Shivsena: निषेधाच्या नादात बाळासाहेबांचा फोटो फाडला, शिंदेंच्या नेत्या शायना एनसींचा VIDEO चर्चेत; ठाकरेसेना आक्रमक

या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून स्टंटबाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. या टोळीकडून स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासोबतच महामार्गावरील इतर वाहनचालक आणि नागरिकांच्याही सुरक्षेला धोका निर्माण केला जात होता. अटक केल्यानंतर आरोपींनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत का? तसेच टोळीतील सदस्य इतर कोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत का? याचा तपास अंधेरी पोलिसांकडून सुरू आहे.

महामार्गावर स्टंटबाजी करून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अशा प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.