माधव सावरगावे, साम टीव्ही
माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नांदर येथे घडली आहे. चॉकलेट आणि वडापाव खायला देण्याचे आमिष दाखवत फिरायला जाण्याच्या बहाण्याने दोन चिमुकल्या मुलांना दुचाकीवर बसवून जन्मदात्या पित्यानेच त्यांना जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
श्याम (वय ५) आणि आर्यन (वय ७) अशी कालव्यात फेकण्यात आलेल्या दोन्ही चिमुकल्यांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे. मुलांना कालव्यात फेकले जात असल्याचे पाहून प्रत्यक्षदर्शींनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांच्यावर दगडफेक करत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सोमनाथ रोडगे याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याने दोन्ही मुलांना कालव्यात फेकल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कालव्यात वाहून गेलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि नातेवाईकांकडून शोधमोहीम सुरू आहे. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जन्मदात्या पित्यानेच स्वतःच्या मुलांसोबत असे कृत्य केल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.