Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: ऐन लग्नसराईत सोनं पुन्हा महागलं! १ तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

Gold Rate Today 17th December 2025 Price Hike: सोन्याचे दर गेल्या अनेक दिवसांपासून वाढताना दिसत आहे. आजदेखील सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ६५० रुपयांनी वाढले आहेत.

Siddhi Hande

सोन्याचे दर वाढले

प्रति तोळ्यामागे ६५० रुपयांची वाढ

ऐन लग्नसराईत सोन्याचे दर वाढले

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. काल सोन्याचे दर घसरले होते. त्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ६५० रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईत सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

सोन्याचे दर वाढले (Gold Price Hike)

सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ६५० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,३४,५१० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ५२० रुपयांनी वाढले असून १,०७,६०८ रुपये झाले आहेत. तर १० तोळ्यामागे सोन्याचे दर ६,५०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १३,४५,१०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर ६०० रुपयांनी वाढले असून १,२३,३०० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे ४८० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १० तोळ्यामागे ६००० रुपयांची वाढ होऊन हे दर १२,३३,००० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेटचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर ४९० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,००,८८० रुपये झाले आहे. ८ ग्रॅममागे ३९२ रुपयांची वाढ होऊन हे दर ८०,७०४ रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे ४,९०० रुपयांची वाढ झाली असून हे दर १०,०८,८०० रुपये झाले आहेत.

लग्नसराईच्या दिवसात अनेकजण सोने खरेदी करतात. या दिवसात सोन्याच्या दरात होणारी वाढ सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नाहीये. सोन्याचे दर १,३०,००० पेक्षा जास्त रुपयांवर आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्याचीही संख्या कमी होताना दिसत आहे. यामुळेच सोन्याचे दर कमी करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी खेळी; अजित पवारांच्या नेत्याची उपनगराध्यक्षपदी निवड

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये भाजपा उमेदवाराच्या नातेवाईकडून पैसे वाटल्याचा प्रकार

Makeup Tips: ब्लश, ब्रॉन्झर आणि हायलाइटरमध्ये नेमका फरक काय?

Solapur Politics: मोठी बातमी! सोलापुरात भाजपकडून अजित पवारांना धक्का, मतदानाआधीच राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार फोडला

Makar Sankranti : मकर संक्रांतीला चंद्रासारखे खुलेल रूप, चमकदार अन् मऊ त्वचेसाठी 'गाजर'चा असा करा वापर

SCROLL FOR NEXT