GOLD PRICE TODAY: 24K GOLD FALLS BY ₹2000, CHECK LATEST GOLD AND SILVER RATES IN MUMBAI, PUNE AND DELHI Saam tv
बिझनेस

Gold Rate Today : सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचा भाव काय ? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Gold Silver Today Price Update : सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव २ हजार रुपयांनी कमी झाला असून चांदीचे दर स्थिर आहेत. मुंबई, पुणे आणि दिल्लीतील आजचे ताजे सोने-चांदीचे दर जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली

  • २४K सोने २ हजार रुपयांनी स्वस्त

  • चांदीचे दर स्थिर असून १०० ग्रॅम चांदीचा भाव २५,००० रुपये

  • मुंबई, पुणे आणि दिल्लीमध्ये सोन्याच्या दरांमध्ये किरकोळ फरक

  • गुंतवणूकदारांना मोठा दिलासा

Gold Rate Today : मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे देशभरात महागाईचे टेन्शन भलतेच वाढले आहे. अशातच नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली, तर चांदीचे दर अद्याप स्थिर आहेत. २४k १ तोळा सोन्याचा भाव २ हजारांनी घसरला असून आजची बाजारातील किंमत १,४५, ६४० इतकी आहे. तसेच १०० ग्रॅम चांदीचे आजचे दर २५,००० इतके आहेत. सणासुदीच्या काळात सोन्याची घसरण ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांना दिलासा देणारी असून खरेदीसाठी सुवर्णसंधी ठरली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने चांदीचे आजचे ताजे दर.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १४,५६४

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,१६,५१२

  • १० ग्रॅम: आजचे दर १,४५,६४०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १४,५६,४००

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १३,३५०

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,०६,८००

  • १० ग्रॅम: आजचे दर १,३३,५००

  • १०० ग्रॅम: आजचे दर १३,३५,०००

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १०,९२३

  • ८ ग्रॅम: आजचे दर ८७,३८४

  • १० ग्रॅम: आजचे दर १,०९,२३०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १०,९२,३००

मुंबई, पुण्यामध्ये सोन्याचे दर किती? (Mumbai Pune Gold Rate Today)

गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार, आज सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर घसरले असून मुंबईत (Mumbai Gold Rate Today) २४k चे दर १४,५६४ रुपये आहे, २२k चे दर १३,३५० रुपये , तर १८k चे दर १०,९२३ रुपये आहेत. तसेच पुण्यात २४k चे दर १४,५६४ रुपये आहे, २२k चे दर १३,३५० रुपये, तर १८k चे दर १०,९२३ रुपये आहेत. दिल्लीत मात्र सोन्याचे दर १४,५७९ इतके आहेत. दरम्यान सोने गुंतवणूक आणि खरेदीदारांसाठी हा सुवर्णकाळ आहे.

चांदीचे दर किती? ( Silver Rate Today)

सराफा बाजारात आज चांदीचे दर स्थिर आहेत. चांदीचे ताजे दर पुढीलप्रमाणे आहेत.

  • १ ग्रॅम चांदीचे दर २५०

  • ८ ग्रॅम चांदीचे दर २,०००

  • १० ग्रॅम चांदीचे दर २,५००

  • १०० ग्रॅम चांदीचे दर २५,०००

  • १००० ग्रॅम चांदीचे दर २,५०,०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषद निवडणूकीत रेश्मा काळे यांच्या बंडखोरीमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली!

Pune Crime: खून, दरोडा आणि चोरी! तब्बल ११९ गुन्हे दाखल असलेल्या गुंडासह तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, उधळला दरोड्याचा कट

त्वचेमध्ये दिसणाऱ्या 'या' 5 बदलांकडे कधीही दुर्लक्ष करू नका

India vs Afghanistan: हार्दिक पंड्या OUT, कोणत्या खेळाडूची होणार एन्ट्री? पाहा अफगाणिस्ताविरूद्ध्या वनडेसाठी कशी असेल प्लेईंग ११

मुंबईत जन्म प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! 19,734 बनावट दाखले होणार रद्द; 4 वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांचे निलंबन

SCROLL FOR NEXT