Mumbai gold rate today : देशभरात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज ६ सप्टेंबर रोजी सराफा बाजारात १८ कॅरेट, २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचे नवीन दर जाहीर झाले आहेत. दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि जयपूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत आज बदल झाला आहे.
गेल्या एका आठवड्यात सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आठवडाभरात २४ कॅरेट सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम तब्बल ३,४४० रुपयांनी कमी झाले आहेत, तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात ३,१५० रुपयांची घट झाली आहे. केवळ सोनेच नाही, तर चांदीच्या किमतीतही प्रति किलो ५,००० रुपयांची मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने चढउतार होत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. आज, ६ सप्टेंबर रोजी सकाळी, राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १५४९५० रुपये आहे. मुंबईत हा भाव प्रति १० ग्रॅम १५४८०० रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस ४,४६५.३४ डॉलर आहे.
राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,५४,९५० आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,४२,०५० आहे.
मुंबई आणि कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १४१९०० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १५४८०० रुपये आहे.
चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१५६,६७० आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१४३,६१० आहे.
पुणे आणि बंगळूरु या दोन्ही शहरांमध्ये, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १५४८०० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १४१९०० रुपये आहे.
सोन्याप्रमाणेच चांदीचे दरही आठवडाभरात स्वस्त झाले आहेत. एका आठवड्यात चांदीच्या दरात ₹५,००० ची घट झाली आहे. ६ सप्टेंबरच्या सकाळी चांदीचा भाव ₹२५०,००० प्रति किलोग्राम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा भाव प्रति औंस $६६.७२ आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात देशांतर्गत चांदीच्या भावाने ₹४००,००० प्रति किलोग्रामचा विक्रमी उच्चांक गाठला होता. तेव्हापासून त्यात अंदाजे ४० टक्क्यांनी घट झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.