Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! १ तोळा ५,४०० रुपयांनी महागलं; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today 23rd January 2025: सोन्याचे दर आज पुन्हा एकदा वाढले आहेत. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ५,४०० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे.

Siddhi Hande

सोन्याच्या दरात विक्रमी वाढ

प्रति तोळ्यामागे ५,४०० रुपयांनी सोनं महागलं

१ तोळा सोन्याचे दर १ लाख ६० हजारांवर

सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. मागच्या तीन दिवसात सोन्याचे दर जवळपास १० हजारांनी वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी सोन्याचे दर सर्वाधिक वाढले होते. त्यानंतर काल हे दर कमी झाले होते. आता पुन्हा सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याच्या दरात ५,४०० रुपयांनी वाढले आहेत. सोन्याचे दर १,५९,७१९ रुपये झाले आहेत. १ तोळा सोनं जवळपास १ लाख ६० हजारांवर विकले जात आहे.

सोन्याचे दरात विक्रमी वाढ (Gold Rate Hike Today)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ५४०० रुपयांनी वाढले आहेत. ८ ग्रॅममागे सोने ४,३२० रुपयांनी महागलं असून १,२७,७६८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ५४००० रुपयांनी महागले आहेत. हे दर १५,९७,१०० रुपये झाले आहेत. हे आतापर्यंतचे सर्वाधिक दर आहेत.

२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate)

२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४,९५० रुपयांनी महागले आहेत. हे दर १,४६,४०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ३,९६० रुपयांची वाढ झाली असून हे दर १,१७,१२० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ४९,५०० रुपयांनी महागलं असून १४,६४,००० रुपये झाले आहे.

१८ कॅरेटचे दर ( 18K Gold Rate)

१८ कॅरेट सोन्याचे दर ४०५० रुपयांनी महागले असून हे दर १,१९,७८० रुपये झाले आहे. ८ ग्रॅममागे सोनं ३,२४० रुपयांनी महागलं असून ९५,८२४ रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ४०,५०० रुपयांनी वाढले असून ११,९७,८०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूरमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, आरोपीला पोलीस कोठडी; कोर्टात काय झालं?

मुंबईतील लोकल ट्रेनची गर्दी २ महिन्यात कमी होणार; रेल्वे प्रशासनाने दिली महत्वपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: बीडच्या परळी नगर परिषदेच्या प्रशासनाला पडला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचा विसर

Vatana Batata Rassa Bhaji: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी झणझणीत वटाणा-बटाटा रस्सा भाजी! पाहा ही सोपी रेसिपी

घरात टाकली धाड; 61 किलो चांदी अन् नोटांचा डोंगर पाहून पोलीस आयुक्तांचे डोळे झाले पांढरे

SCROLL FOR NEXT