Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate: सोनं खरेदी करताय? थांबा... प्रति तोळा दर १ लाखांच्या खाली येणार, कुणी वर्तवला अंदाज

Gold Rate Prediction 2027: सोन्याचे दर आणखी घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोन्याचे दर १ लाखांपेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिका- रशियाचे संबंध, मध्यवर्ती बँकांचे धोरण या गोष्टींमुळे सोन्याचे दर कमी होऊ शकतात.

Siddhi Hande

सोन्याचे दर घसरणार

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर घसरले

सोन्याचे दर १ लाखांपेक्षा कमी होणार

मागील काही वर्षांपासून सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ झाली होती. सोन्याची किंमत प्रति तोळा १.८४ लाख रूपयांपर्यंत पोहचली होती. पण फेब्रुवारीच्या सुरुवातीला सोन्याच्या किंमतीला उतरती कळा लागली. दोन आठवड्यात सोन्याचे दर जवळपास ३६ हजार रूपयांनी घसरले. आताच्या ताज्या दरानुसार, सोन्याचे दर १.५६ लाखांवर आले आहेत. तरीही ही किंमत सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरच आहे. पण सोने खरेदी करणार्‍यांसाठी दिलासादायक अंदाज समोर आला आहे. व्यापार अन् उद्योगावर रिसर्च करणारे PACE 360 चे जागतिक रणनितिकार अमित गोयल यांनी सोन्याचे दर एक लाख रूपयांच्या खाली येतील असा अंदाज वर्तवला आहे. याबाबतचं कारण ब्लूमबर्ग एजन्सीने वर्तवला आहे. पुढील काही दिवसांत सोनं किती रूपयांनी घसरणार? हा अंदाज नेमका काय आहे? याबाबत जाणून घेऊयात...

आज १ तोळा सोन्याचे दर १,५६,२०० रुपये आहेत. सोन्याच्या दरात मागच्या महिन्याच्या तुलनेत जवळपास २४,५०० रुपयांची घसरण झाली आहे. सोनं १३.५० टक्क्यांनी घसरले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील सोन्याचे दर घसरले आहेत.

ब्लूमबर्ग एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, क्रेमलिन अमेरिकेसोबत आर्थिक भागीदारी करण्याची शक्यता आहे. यामुळे मॉस्कोचे डॉलर आधारित व्यापार पुन्हा सुरु होतील. हे पाऊल ब्रिक्स देशांच्या डॉलरीकरण कमी करण्यावर भर आहे. अमेरिकन डॉलरवर अवलंबून राहणे कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिक्स सदस्य व्यापार करताना डॉलरची जागा घेण्यासाठी सोनं जमा करत आहे. परंतु रशियाने पुन्हा डॉलरद्वारे व्यव्हार सुरु केले तर त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे.

सोन्याचे दर कमी होतील का? (Gold Rate Fall Till 1 Lakh)

जागतिक राजकीय घडामोडींमुळे सोन्याचे दर कमी होणार का, प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत पेस ३६० चे जागतिक रणनितिकार अमित गोयल यांनी माहिती दिली आहे. सोन्याच्या किंमती आणि मागणी यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. अमित गोयल यांना विश्वास आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस ५,६२६.८० डॉलर होण्याची शक्यता आहे. भारतात प्रति १० ग्रॅममागे १,८०,७७९ रुपये मोजावे लागतात.

डॉलरकीरणामुळे जागतिक मध्यवर्ती बँकांकडून कमीत कमी विक्री होऊ शकते. ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामधील तफावत कमी होई शकते. यामुळे सोन्याच्या दरात घसरण होऊ शकते. सोन्याचे दर आधीच १५ टक्क्यांनी घसरले आहेत. यानंतर हे दर अजून घसरण्याची शक्यता आहे.

२०२७ च्या अखेरीस सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १ लाख रुपयांपेक्षाही कमी होऊ शकतात. COMEX सोन्याचे दर प्रति औंस ३००० डॉलर होऊ शकतात, असा अंदाज आहे. त्यामुळे सोन्याचे दर १ तोळ्यामागे ९०,००० ते १,००,००० रुपयांपर्यंत घसरु शकतात, असे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Surya Grahan 2026: ग्रहणापूर्वी करा ही 4 कामं, अन्यथा वर्षभर होईल नुकसान; 'या' राशीवर होईल गंभीर परिणाम, वेळीच व्हा सावध

Accident Video : ऑफिसला जाताना कंटेनर 'यम' बनून आला, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा चेंदामेंदा, व्हिडिओ पाहून थरकाप उडेल

Homemade Hair Oil Tips: केस पायापर्यंत वाढतील, घरीच बनवा तेल

High BPControl Tips: BP चा त्रास होईल 7 दिवसांत कमी, फक्त सकाळी हे पेय घ्या; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT