Gold Rate Prediction Saam Tv
बिझनेस

Gold Rate Prediction: १ लाख २३ हजार तोळा किंमतीच्या सोन्यामध्ये आता गुंतवणूक फायद्याची की तोट्याची? तज्ज्ञांनी दिलेला सल्ला वाचा

Gold Rate Prediction: सोन्याचे दर सातत्याने वाढत आहे. आज सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सध्या सोन्यात गुंतवणूक करावी की नाही असा प्रश्न विचारला जात आहे.

Siddhi Hande

सोन्याच्या दराने उच्चांक गाठला

सध्या सोने खरेदी करावे की नाही?

सोन्याच्या दरात वाढ का होते?

सध्या सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर सातत्याने वाढताना दिसत आहेत. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्न खरेदीदारांना पडलेला आहे. आज सोन्याचे दर प्रति तोळा १,२३,००० रुपये आहेत. सोन्याचे दर सतत वाढत आहेत. दरम्यान, सध्या सोन्यात गुंतवणूक करणे हे फायद्याचे ठरणार की तोट्याचे असा प्रश्न विचारला जात आहे.

सोन्यात गुंतवणूक करावी की नाही? (Invest in Gold Or Not)

सोन्यात गुंतवणूक करावी की नाही असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. याबाबत टाटा म्युच्युअल फंडच्या रिपोर्टने म्हटलं आहे की, सध्या जागतिक पातळीती बदल,यूएस शटडाउन आणि अमेरिकेच्या टॅरिफ धोरणातील बदल जगाने स्विकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सोन्याच्या किमती पुढच्या काही दिवसात $3,500-$4,000 होऊ शकतात. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्यामझ्ये गुंतवणूक करत राहू शकतात, असं त्यांनी म्हटलं आहे.

टाटा म्युच्युअल फंडच्या म्हणण्यांनुसार,महागाई आणि जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता, चलनातील बदल यामुळे सोन्यात लाँग टर्म गुंतवणूकीसाठी अनुकूल वातावरण असेल. याचसोबत चांदीमधीलही गुंतवणूक फायद्याची असणार आहे. गुंतवणूकदार सोने आणि चांदीमध्ये ५०:५० गुंतवणूक करण्याचा विचार करु शकतात. सध्या चांदीच्या दरातदेखील चांगली वाढ होताना दिसत आहे, असं टाटा म्युच्युअल फंडने सांगितले आहे.

पृथ्वीफिनमार्ट कमोडिटी रिसर्चचे मनोज कुमार जैन यांनी सांगितले की, १,१८,००० ते १,२०,००० रुपयांच्या लक्ष्यासाठी १,१७,७०० रुपयांच्या आसपास सोने खरेदी करु शकतात. तर १,४६,५०० ते १,४८,००० च्या लक्ष्यासाठी १,४२,७०० च्या लॉससह १,४४,४०० रुपयांना सोने खरेदी करु शकतात.

सोन्याचे दर का वाढतात? (Why Gold Price Rising?)

या वर्षी भारतात आतापर्यंत सोन्याच्या किंमती ५० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. यामागे अनेक कारणे आहेत. अमेरिकेने भारतावर लावलेले टॅरिफ धोरण यामुळे जागतिक पातळीवर अनिश्चितता निर्माण झाली आहे. याचसोबत अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर आणखी कमी होऊ शकते. तसेच डॉलरच्या किंमतीदेखील घसरत आहे. यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. हे दर पुढच्या काही दिवसात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेस -मनसे आघाडीबाबत विजय वडेट्टीवार यांचं पुन्हा भाष्य

Pune : गावाकडून शहराकडे...! पुण्यात कोयता गँगनंतर बिबट्याची दहशत; सतर्क राहा पण घाबरू नका, वन विभागाचं आवाहन

Gauri Palwe: गर्भपात अन् कागदावर अनंतचं नाव; गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, अडगळीच्या वस्तूंमध्ये सापडले महत्त्वाचे पेपर

Monday Horoscope : श्री गणरायांची कृपादृष्टी पडणार; ५ राशींच्या लोकांना मिळणार शुभसंकेत

लोकांच्या खऱ्या प्रश्नांना बगल; खान, पठाण, शेलार, शिंदे या नावांवर राजकारण; भाजप नेत्यांच्या आरोपावर असलम शेख काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT