Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate: सोन्याचे दर पुन्हा वाढले; प्रति तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

Gold Rate Today 10th September 2025: सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. आजही सोन्याचे दर वाढले आहेत. प्रति तोळ्यामागे सोन्याचे दर २१९ रुपयांनी वाढले आहेत.

Siddhi Hande

सोन्याच्या दरात आजही वाढ

सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २१९ रुपयांची वाढ

सोन्याचे दर १ लाख १० हजारांच्या पार

सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. गणेशोत्सवाच सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. त्यानंतर आजदेखील सोन्याचे दर वाढले आहे. सोन्याचे दर आज १ लाख १० हजार रुपयांवर गेले आहे. सोन्याचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर असेच वाढत राहिले तर सोनं खरेदी करावे की नाही असा प्रश्न आता ग्राहकांना पडला आहे.आजदेखील सोन्याचे दर वाढले आहेत.प्रति तोळ्यामागे २१९ रुपयांनी वाढ झाली आहे.

सोन्याचे दर वाढले (Gold Rate Increases)

सोन्याचे दर आज प्रति तोळ्यामागे २१९ रुपयांनी वाढले आहेत. सोन्याचे दर आज १,१०,५०९ रुपये झाले आहेत. सोन्याचे दर ८ ग्रॅममागे १७५ रुपयांनी वाढले आहेत. हे दर ८८,४०७ रुपये झाले आहेत. १० तोळे सोन्याचे दर ११,०५,०९० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे २,१९० रुपयांनी वाढ झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २०० रुपयांनी वाढले आहेत. २२ कॅरेट सोन्याचे दर आज १,०१,३०० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे १६० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅमचे दर ८१,०४० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याच्या दरात २००० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १०,१३,००० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात १ तोळ्यामागे १६० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर ८२,८८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे १२८ रुपयांनी वाढ झाली असून हे दर ६६,३०४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १६०० रुपयांनी वाढले आहेत. १० तोळ्याचे दर ८,२८,८०० रुपये झाले आहेत.

सोन्याचे दर असेच वाढत राहणार

सोन्याचे दर यापुढेही असेच वाढत राहणार असल्याचे सांगितले जात आहे. सोन्याचे दर १ लाखांच्या पार गेले आहेत. पुढच्या काही दिवसांत सोन्याचे दर सव्वा लाखापार जाऊ शकतात, असंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे इथून पुढे सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नसणार आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला खूप फटका बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heatwave In Nagpur: नवतपात सूर्याचा कहर, नागपुरात २४ तासांत १० जणांचा मृत्यू

सकाळी चहाऐवजी प्या 'हे' पाणी; महिनाभरात चरबी वितळेल, दिसाल एकदम बारीक!

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावर शिंदेसेनेचे आंदोलन

Ebola Virus: जीवघेण्या व्हायरसची भारतात एंट्री; लक्षणे दिसताच अहमदाबादमध्ये एकजण आयसोलेट

Cardamom Benefits: जेवणानंतर दररोज खा वेलची; शरीरात होतील 8 बदल, अपचनाचाही त्रास होईल कमी

SCROLL FOR NEXT