Gold Rate : पिवळ्या धातूची चमक कायम, नव्या उच्चांकावर पोहचलं, वाचा आजचे दर

Today's Gold Price: सोन्याच्या दरात प्रचंड वाढ! MCX वर आज १० ग्रॅम सोन्याचा भाव ₹१,०९,५०० च्या नव्या उच्चांकावर. चांदीही ₹१,२५,८५० प्रति किलो. फेडच्या दर कपातीच्या अपेक्षांमुळे दर वाढ.
Gold
Gold saam tv
Published On
Summary
  • सोन्याचा दर आज ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला – प्रति १० ग्रॅम ₹१,०९,५००

  • MCX वर सकाळी ०.४०% वाढ; चांदी ₹१,२५,८५० प्रति किलो

  • डॉलर घसरला, फेड दरकपातीच्या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांचा सोन्याकडे ओढा

  • सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याला पसंती, पुढील दिवसांत दर आणखी वाढण्याचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. मागील दोन वर्षांमध्ये सोन्याच्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दराने नवा इतिहास रचला. सध्या, कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव १,० ९,५०० रुपये या नव्या उच्चांकावर पोहचला आहे. पुढील आठवड्यात यूएस फेडच्या दर कपातीच्या अपेक्षांमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली.

आज सकाळी सराफा बाजार उघडताच एमसीएक्सवरील सोनं ०.४० टक्क्यांनी वाढून ₹ १,०८,९५५ प्रति १० ग्रॅमवर पोहचले होते. त्यानंतर त्यात आणखी वाढ झाली. चांदी त्यावेळी ०.२२ टक्क्यांनी वाढून ₹ १,२५,८५० प्रति किलो इतकी झाली. गेल्या काही दिवसांत पिवळ्या धातूची चमक कायम राहिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण, युद्धाचे संकेत अन् आर्थिक मंदीची शक्यतामुळे गेल्या काही दिवसांत सोन्याच्यी किंमती सातत्याने वाढत आहे. लोकांकडून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती दर्शवली जातेय. सोन्याशिवाय चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. एक किलो चांदीची किंमत एक लाखांच्या पुढे गेली आहे. पुढील काही दिवस पिवळ्या धातूची चमक कायम राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Gold Rate
goodreturns संकेतस्थळानुसार एक ग्रॅम सोन्याचे दरgoodreturns

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारत सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसत आहे. सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जातेय. त्यामुळे अनेकजण गुंतवणुकीसाठी सुरक्षीत पर्याय म्हणून सोन्याला पसंती दर्शवतात. त्याशिवाय आज जागतिक मार्केटमध्येहही डॉलरची किंमत घसरली आहे. या महिन्यात सोन्याच्या किमती वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे फेडच्या दर कपातीच्या अपेक्षा मानले जातेय.

Gold
ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? आमदार-नगरसेवक संपर्कात, शिंदेंच्या नेत्याचा दावा

मागील वर्षभरात सोन्याच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी स्पॉट गोल्डचा भाव प्रति १० ग्रॅम ७६,००० रुपयांच्या जवळपास होता . या वर्षी ८ सप्टेंबर रोजी तो प्रति १० ग्रॅम १,०८,००० रुपयांच्या जवळपास होता . अमेरिकेचा टॅरिफ, राजकीय तणाव, डॉलरचा कमकुवतपणा, मध्यवर्ती बँकांकडून जोरदार खरेदी, नाजूक आर्थिक धोरणे आणि जागतिक आर्थिक वाढीबद्दलच्या चिंता यामुळे जागतिक स्तरावर अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळेच सोन्याच्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढतच आहे.

Gold
आयुष कोमकरच्या मारेकऱ्यांना बेड्या, बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक, मास्टरमाईंड फरार!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com