Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Gold Rate Today 6th September 2025: आज सोन्याचे दरात वाढ झाली आहे. गणेशोत्सवात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. १० तोळ्याचे दर ८,७०० रुपयांनी वाढले आहेत.
Today Gold Rate
Today Gold RateSaam Tv
Published On

गणेशोत्सव सुरु आहे. गणेशोत्सवात सोन्याचे दर सतत वाढत आहे. मागच्या १० दिवसांत सोन्याचे दर वाढताना दिसले. ऐन गणेशोत्सवात सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र फटका बसत आहे. सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्न ग्राहकांना पडत आहे. आजदेखील सोन्याचे दर वाढले आहे. प्रति तोळ्यामागे सोन्याचे दर ८७० रुपयांनी वाढले आहेत.

Today Gold Rate
Gold Price Today: सोन्याने भाव खाल्ला! १० तोळा सोन्याच्या दरात ७६०० रुपयांची वाढ, आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

गणेशोत्सवाच्या १० दिवसात सोन्याने उच्चांकी गाठली आहे. सोन्याचे दर जवळपास १ लाख ८ हजार रुपये झाले आहे.सणासुदीच्या दिवसात सोन्याचे दर वाढत असल्याने ग्राहकांना मात्र मोठा फटका बसला आहे. तसेच सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.

आजचे सोन्याचे दर वाढले (Gold Rate Today On Ganpati Visarjan)

गेल्या १० दिवस सोन्याचे दर सतत वाढत आहे. आज २४ कॅरेट सोन्याचे दर ८७० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,०८,४९० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याच्या दरात ६९६ रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर ८६,७९२ रुपये आहेत. तर १० तोळा सोन्याच्या दरात ८,७०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १०,८४,९०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर

२२ कॅरेट सोन्याचे दर ८०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ९९,४५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६४० रुपयांनी वाढवून ७९,५६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ८००० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर ९,९४,५०० रुपये आहेत.

Today Gold Rate
Today Gold Rate: गणेशोत्सवाआधी सोने- चांदीचे भाव घसरले, प्रति तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार?

१८ कॅरेट सोन्याचे दर

आज १ तोळा सोन्याचे दर ८१,३७० रुपये झाले आहेत. या दरात ६५० रुपयांनी वाढ झाली आहे. १० तोळ्यामागे ६५०० रुपयांची वाढ झाली असून हे दर ८,१३,७०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५२० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ६५,०९६ रुपये आहेत.

Today Gold Rate
Gold Price Today: सोन्याने भाव खाल्ला! १० तोळा सोन्याच्या दरात ७६०० रुपयांची वाढ, आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com