Gold Prices Increase saam tv
बिझनेस

Gold Price Today: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर सोन्याच्या किमतीत मोठी वाढ; सोन्याचा भाव पुन्हा लाखाच्या दिशेने

Gold Rate Today: सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जातेय. अशातच आज सोन्याची किंमत वाढली आहे. आजच्या दिवशी सोन्याचा भाव काय आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

Gold Rate Today: सध्या सोन्याच्या दरामुळे सर्व ग्राहकांची चिंता वाढली आहे. लग्नसराईचा काळ असल्याने अनेकजण सोन्याची खरेदी करतात. आजच्या दिवशी देखील सोन्याचा भाव किरकोळ वाढला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याचं समोर आलं आहे.

मनी कंट्रोल वेबसाईच्या माहितीनुसार, आज सोन्याच्या किमतीत १००० रुपयांची वाढ झाली. काल म्हणजेच बुधवारी सोनं १,००,०० रुपयांच्या वर होतं मात्र त्यानंतर त्यामध्ये सुधारणा झाली. गुरुवार ८ मे रोजी सकाळी सोन्याच्या किमतीत काहीशा प्रमाणात वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ९९,१०० रुपयांच्या वर आणि २२ कॅरेटची किंमत ९०,९०० रुपयांच्या वर आहे.

दिल्ली आणि मुंबईमध्ये सोन्याचा दर

आजच्या दिवशी म्हणजेच ८ मे २०२५ रोजी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ९०,९१० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ९९,१६० रुपये प्रति १० ग्रॅम असल्याची माहिती आहे. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ९०,७६० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ९९,०१० रुपये प्रति १० ग्रॅम असल्याची माहिती आहे.

कसा आहे आजचा चांदीचा भाव?

8 मे रोजी चांदीचा भाव 99,100 रुपये प्रति किलो आहेत. कालच्या तुलनेत आज चांदीचा भाव देखील वाढला आहे. चांदी आणि सोनं दोघांचा भाव वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री बसणार आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दर

  • दिल्ली-९०,९१०

  • चेन्नई-९०,७६०

  • मुंबई-९०,७६०

  • कोलकाता-९०,७६०

  • जयपूर-९०,९१०

  • नोएडा-९०,९१०

२४ कॅरेट सोन्याचा दर

  • दिल्ली-९९,१६०

  • चेन्नई-९९,०१०

  • मुंबई-९९,०१०

  • कोलकाता-९९,०१०

  • जयपूर-९९,१६०

  • नोएडा-९९,१६०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचं ४४ व्या वर्षी निधन, लिव्हर इन्फेक्शनने घेतला जीव; सिनेसृष्टीवर शोककळा

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रात काँग्रेसला विक करण्यात शरद पवारांसह इतरांची भूमिका महत्वाची - नाना पटोले

३७ व्या वर्षी अजिंक्य नाईक बनले MCAचे सर्वात तरुण अध्यक्ष|VIDEO

Eyebrow Care: ओव्हरप्लक्ड Eyebrows पुन्हा कसे वाढवायचे? पातळ झालेल्या भुवयांसाठी हे घरगुती उपाय ठरतील बेस्ट

पुण्यातील बोपोडी जमीन व्यवहारात ट्विस्ट; अमेडीया कंपनी आणि शीतल तेजवानीला क्लीन चिट, पोलिसांचा युटर्न

SCROLL FOR NEXT