Gold Prices saam tv
बिझनेस

Gold Price: सोनं आजही स्वस्त झालं, १० तोळं सोन्याच्या किंमतीत ५५०० रूपयांनी घसरण; वाचा आजचा दर

Gold prices dropped: सोन्याच्या दरात १० दिवसांत ३,५०० रुपयांची मोठी घट झाली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोनं ९७,५०० वर आलं असून चांदीचा दर मात्र स्थिर आहे.

Bhagyashree Kamble

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घट होत आहे. गेल्या १० दिवसांत सोन्याच्या दरात सुमारे ₹३,५०० रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचा भाव १,०१,००० रूपयांवरून ९८,००० रूपयांवर आला आहे. २८ जून रोजी सोन्याच्या दरात तब्बल ५५० रुपयांची घट झाली असून, सध्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर ९७,५०० आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ८१,३०० पेक्षा अधिक आहे. तर, देशात एक किलो चांदीचा दर १,०७,८०० रूपये प्रति किलो आहे. चांदीच्या दरात घट होत नसल्याचं चित्र आहे.

२८ जून रोजी सोन्याचा दर

शनिवारी २८ जून रोजी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. दिल्लीत २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८९,३०० रूपये आहे. तर, २४ कॅरेट सोन्याचा दर ९७,५७० रूपये आहे. मुंबईतही २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८९,३०० रूपये तर, २४ कॅरेट सोन्याचा दर ९७,४२० रूपये इतका आहे. पटना लखनऊ, जयपूरसारख्या मोठ्या शहरांमध्येही सोन्याचा भाव याच दराभोवती आहे.

चांदीची किंमत

गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरातही सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे. मात्र, आज चांदीचा दर घसरला आहे. आज २८ जून रोजी चांदीचा भाव १,०७,८०० रूपये प्रति किलोवर आहे. कालच्या तुलनेत चांदीचा दर १०० रूपयांनी घसरला आहे.

देशात सोन्याचे दर ठरवले जातात?

भारतात सोन्याचा दर दररोज बदलते. सोन्याचा दर अनेक घटकांवर अवलंबून असते. जसे की, जागतिक बाजारपेठेत सोन्याची किंमत, डॉलर आणि रूपयाच्या मूल्यात बदल आणि सरकारने लादलेले कर. परंतु, भारतात सोने हे केवळ गुंतवणूक नाही तर ती परंपरा आणि श्रद्धेशी जोडलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT