Gold Price Drop Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: वटपौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा 9300 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Gold Price Drop Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आज खरेदीची सुवर्णसंधी आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज सोनं खरेदीला जाण्यापूर्वी लेटेस्ट दर किती ते घ्या जाणून...

Priya More
  • वटपौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण

  • २४ कॅरेट १० तोळे सोनं ९,३०० रुपयांनी झालं स्वस्त

  • २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दरही कमी झाले

  • चांदीच्या दरात आज कोणताही बदल झाला नाही

सोनं- चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आणि वटपौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली. तर चांदीचे दरात काहीच बदल झाला नाही. आज सराफा बाजार उघडाताच सोन्याच्या दरामध्ये मोठा बदल पाहायला मिळाला. वटपौर्णिमेनिमित्त सोनं खरेदीची महिलांसाठी चांगली संधी आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ९३० रुपयांनी घसरण झाली. आज सोनं-चांदीचे खरेदी करायला जाण्यापूर्वी १८,२२ आणि २४ कॅरेटचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ९३० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४३,०२० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ९३०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १४,३०,२०० रुपये खर्च करावे लागणार आहे.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ८५० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,३१,१०० रुपये मोजावे लागतील. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ८५०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १३,११,००० रुपये मोजावे लागतील.

२४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ १८ कॅरेटचं सोनं देखील स्वस्त झालं आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ६९० रुपये कमी झाले आहेत. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,०७,२७० रुपये मोजावे लागतील. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ६९०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १०,७२,७०० रुपये खर्च कारवे लागतील. दरम्यान, आज चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. १ किलो चांदी २,४०,००० रुपयांना विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला पुणे सत्र न्यायालयात केलं हजर

Sleep health: नाईट शिफ्ट आणि रात्री जागरणामुळे शरीरात नेमकं काय घडतंय? डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य

डायबिटीजचे रूग्ण फणस खाऊ शकतात का?| Jackfruit Eat In Diabetes?

Pakistan Airstrike: पाकिस्तानकडून मध्यरात्री अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक, ३७ जणांचा मृत्यू

Ashadhi Wari : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे नियोजन; कुठून कधी धावणार ट्रेन? जाणून घ्या वेळापत्रक

SCROLL FOR NEXT