Manasvi Choudhary
धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अनेकदा लोक गाईगडबडीत किंवा वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता करत नाही. पण तुम्हाला माहितीये का? सकाळचा नाश्ता केला नाही तर काय परिणाम होतो.
रात्री झोपल्यानंतर सकाळी शरीराला उर्जेची गरज असते अशावेळी जर नाश्ता केला नाही तर शरीराला थकवा येतो. शरीराची पचनक्रिया शक्ती मंदावते.
शरीराला दिवसाची सुरुवात करण्यासाठी ग्लुकोजची गरज असते. नाश्ता न केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक घसरते. यामुळे महिनाभर सतत अशक्तपणा, डोकेदुखी, आळस या समस्या निर्माण होतात.
सकाळी रिकामे पोट असले की आम्लचे प्रमाण वाढते. सतत महिनाभर नाश्ता न केल्यास तीव्र अॅसिडिटी, मळमळ, पोटदुखी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या गंभीर पचनाच्या तक्रारी उद्भवतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.