Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं १०,९०० रुपयांनी झालं स्वस्त, तुमच्या शहरातील २४- २२ कॅरेटचे आजचे दर किती?

Gold Prices Drop Sharply in India: सोनं-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. १० तोळा सोनं १०,९०० रुपयांनी स्वस्त झालं. आज १८, २२ आणिी २४ कॅरेट सोन्याचे दर किती आहेत ते आपण जाणून घेणार आहोत...

Priya More

Summary -

  • सोन्याच्या दरात मोठी घसरण

  • आज सराफा बाजारात उघडताच सोनं झाल स्वस्त

  • २४ कॅरेटच्या १० तोळा सोनं १०,९०० रुपयांनी स्वस्त

  • २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दरही घसरले

आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत आहे. या युद्धामुळे इंधन, गॅसचे दर वाढले. तर दुसरीकडे या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं-चांदीच्या दरात सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम आता भारतातील सराफा मार्केटवर होताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत होती या घसरणीला बुधवारी ब्रेक लागला होता. पण आज पुन्हा सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १०९०० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. सोन्याचे आजचे दर किती आहेत ते आपण जाणून घेणार आहोत...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं १०९० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,६२,२२० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १०,९०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं आज १६,२२,२०० रुपयांना विकले जात आहे.

२२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज घसरण झाली आहे. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं १००० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,४८,७०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १०,००० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १४,८७,००० रुपये खर्च करावे लागतील.

२४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटचे सोनं देखील स्वस्त झालं आहे. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ८१० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,२१,६७० रुपये खर्च करावे लागतील. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ८,१०० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १२,१६,७०० रुपये खर्च करावे लागतील. आज २४,२२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे खरेदीची चांगली संधी आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचे दर किती?

मुंबई -

२४ कॅरेट - १६,२२२ रुपये

२२ कॅरेट - १४,८७० रुपये

१८ कॅरेट - १२,१६७ रुपये

पुणे -

२४ कॅरेट - १६,२२२ रुपये

२२ कॅरेट - १४,८७० रुपये

१८ कॅरेट - १२,१६७ रुपये

चेन्नई -

२४ कॅरेट - १६,३३१ रुपये

२२ कॅरेट - १४,९७० रुपये

१८ कॅरेट - १२,७०० रुपये

दिल्ली -

२४ कॅरेट - १६,२३७ रुपये

२२ कॅरेट - १४,८८५ रुपये

१८ कॅरेट - १२,१८२ रुपये

कोलकाता -

२४ कॅरेट - १६,२२२ रुपये

२२ कॅरेट - १४,८७० रुपये

१८ कॅरेट - १२,१६७ रुपये

अहमदाबाद -

२४ कॅरेट - १६,२२७ रुपये

२२ कॅरेट - १४,८७५ रुपये

१८ कॅरेट - १२,१७२ रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT