Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, १० तोळा सोनं ८८०० रुपयांनी स्वस्त; २४ - २२ कॅरेटचे आजचे दर किती?

Gold- Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. १० तोळा सोनं ८८०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर एक किलो चांदी २००० रुपयांनी स्वस्त झाली. वाचा आजचे दर किती?

Priya More

Summary -

  • सोन्याचे दर सलग तिसऱ्या दिवशी घसरले.

  • २४ कॅरेट सोनं ८८० रुपये प्रति तोळा स्वस्त झाले.

  • १० तोळा सोन्याच्या किंमतीत ८,८०० रुपयांनी घसरण झाली.

  • चांदीचे दरही कमी झाले आहे. १ किलो चांदी २००० रुपयांनी स्वस्त झाली.

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरामध्ये रक्षाबंधनानंतर सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सन्याच्या दरात ८८० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं आज १,०१,४०० रुपयांवर आले आहे. पण हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला जीएसटीसह अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. आज सोनं खरेदी करण्यासाठी जाण्यापूर्वी १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर किती ते घ्या जाणून...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज १८, २२ आणि २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ८८० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,०१,४०० रुपये मोजावे लागणार आहे. काल हेच सोनं खरेदीसाठी १,०२,२८० रुपये द्यावे लागले होते. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात तब्बल ८,८०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १०,१४,००० रुपये द्यावे लागणार आहे. याच सोन्याचा कालचा दर १०,२२,८०० रुपये इतका होता.

आज २२ कॅरेटचे सोन्याचे दर देखील कमी झाले आहेत. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ८०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तु्म्हाला ९२,९५० रुपये मोजावे लागणार आहेत. काल हेच सोनं ९३,७५० रुपयांनी विकले गेले. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ८,००० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,२९,५०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर हेच सोनं काल ९,३७,५०० रुपयांना होते.

आज १८ कॅरेट सोन्याच्या दरामध्ये ६६० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ७६,०५० रुपये मोजावे लागणार आहेत. हेच सोनं काल ७६,७१० रुपयांना खरेदी करावे लागले. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याचे दर ७,६०,५०० रुपयांवर आले आहेत. त्यामुळे आज सोनं खरेदी करण्यासाठी चांगली संधी आहे. आज चांदीचे दर देखील घसरले आहेत. १ ग्रॅम चांदीच्या दरात २ रुपयांनी घसरण झाली असून त्याची किंमत ११५ रुपये इतकी झाली आहे. तर १ किलो चांदीच्या दरात २००० रुपयांनी घसरण झाली असून ते खरेदीसाठी तुम्हाला आज १,१५,००० रुपये द्यावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: मंगळवार ५ राशींसाठी भाग्याचा; कामात बढतीचे योग; वाचा संपूर्ण राशीभविष्य

Avika Gor: 'बालिका वधू'मधील लाडो लवकरच अडकणार विवाहबंधनात, अविकाच्या हातावर रंगली मेहंदी, पाहा फोटो

Maharashtra Live News Update: - सीना नदीला पुर आला अन् दिडशे लोकांची वस्ती पुर्णपणे पाण्याखाली गेली

Maharashtra HSC Exam 2025 : बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! राज्य परीक्षा मंडळाकडून अर्ज भरण्यास मुदतवाढ

Maharashtra Politics : राजकीय उलथापालथ! एकनाथ शिंदेंची ताकद वाढली, चंद्रकांत पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT