Gold: भारतात 'या' ठिकाणी सापडला सोन्याचा साठा, जमिनीखाली आहे लाखो टन सोनं; नेमकं ठिकाण कुठे?

Madhya Pradesh Gold Mine: भारतामध्ये मोठा सोन्याचा साठा सापडला आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये १०० हेक्टर जमिनीखाली सोनं गाडलं गेलं आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण जगाचं लक्ष मध्य प्रदेशकडे लागले आहे.
Gold: भारतात 'या' ठिकाणी सापडला सोन्याचा साठा, जमिनीखाली आहे लाखो टन सोनं; नेमकं ठिकाण कुठे?
Madhya Pradesh Gold Mine:Saam Tv
Published On

Summary -

  • मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये जमिनीखाली सोन्याचा मोठा साठा सापडल्याचा दावा.

  • सिहोरा तालुक्यातील महगवान केवलारी गावात संशोधनात सापडले १०० हेक्टर क्षेत्र.

  • भूगर्भशास्त्रज्ञांनी या भागात सोन्यासारख्या धातूंची उपस्थिती स्पष्ट केली.

  • देशभरातील खाण व्यवसायिकांचे या क्षेत्राकडे लक्ष लागले आहे.

मध्य प्रदेश हे हिऱ्यांच्या खाणींसाठी खूपच प्रसिद्ध आहे. याच मध्य प्रदेशमध्ये आता मोठा सोन्याचा साठा सापडला आहे. मध्य प्रदेशमधील जमिनीखाली अनेक टन सोनं गाडलं गेलं असल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये ही खाण सापडली आहे. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर भूगर्भशास्त्रज्ञांनी जबलपूरमध्ये सोन्याची खाण सापडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मध्य प्रदेशमधील जबलपूर हे मॅगनीज आणि लोहखनिजासह अनेक खनिजांसाठी ओळखले जाते. आता याठिकाणी सोन्याची खाण सापडली आहे. तज्ज्ञांनी त्यांच्या तपासणीत सोनं असल्याचा दावा केला आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, जबलपूर जिल्ह्यातील सिहोरा तहसीलमधील महगवान केवलारी गावात १०० हेक्टरहून अधिक जमिनीवर सोन्यासारख्या धातू आणि कणांची उपस्थिती आढळून आली आहे. यामुळे या जमिनीखाली मोठ्या प्रमाणात सोन्याचे साठे दबले असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भूगर्भशास्त्रज्ञांनी सोनं नेमकं कुठे आहे ते शोधून काढले. त्यामुळे संपूर्ण जगाचे डोळे आता जबलपूरवर लागले आहेत. असे सांगितले जात आहे की, जबलपूरच्या सिहोरा येथे जर खरंच सोन्याचे साठे सापडले तर फक्त मध्य प्रदेशच नाही तर देशाचे भाग्य उजळू शकते. लोह, मॅगनीज, बॉक्साईट आणि इतर संगमरवरी दगडांसाठी ओळखल्या जाणाऱ्या जबलपूरमध्ये सोन्याचे साठे सापडल्यानंतर शास्त्रज्ञांमध्ये चांगलीच उत्सुकता असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Gold: भारतात 'या' ठिकाणी सापडला सोन्याचा साठा, जमिनीखाली आहे लाखो टन सोनं; नेमकं ठिकाण कुठे?
Gold Price: सोन्याचा भाव घसरला! महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी खरेदीदारांना दिलासा; वाचा लेटेस्ट दर

भूगर्भशास्त्रज्ञ आणि खाणतज्ज्ञांनी आतापर्यंत केलेल्या तपासणीत जबलपूरच्या सिहोरा तहसीलमधील महगवान केवलारी येथे सापडलेले सोन्याचे साठे १०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेले आहेत असे दिसून आले. असा अंदाज वर्तवला जात आहे की या जमिनीखाली अनेक टन सोने असू शकते. जबलपूरचा हा परिसर आधीच खाणकामासाठी खूप अनुकूल मानला जातो. यामुळेच देशभरातील खाण व्यवसायिक या भागावर लक्ष ठेवून असतात. अनेक खाण व्यवसायिक वेगवेगळ्या पद्धती आणि अनेक कंपन्यांच्या मदतीने या भागात खाण व्यवसाय करत आहेत.

Gold: भारतात 'या' ठिकाणी सापडला सोन्याचा साठा, जमिनीखाली आहे लाखो टन सोनं; नेमकं ठिकाण कुठे?
Today's Gold Rate: सोन्याच्या दरात ८२०० रुपयांची वाढ; १० तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

दरम्यान, सिहोरा आणि कटनीच्या सीमावर्ती गावांना लागून असलेल्या गावांमध्ये लोहखनिजाचा मोठा साठा आहे. मोठे व्यापारी येथून लोहखनिज उत्खनन करतात. हे लोहखनिज ते चीन आणि जगातील इतर बाजारपेठांमध्ये निर्यात करतात. जबलपूरमधून येणारे लोहखनिज उच्च दर्जाचे असते. त्यामुळे जगातील इतर देशांमध्ये या लोहखनिजाची मोठी मागणी असल्याचे सांगितले जाते. आता जबलपूरमध्ये सोन्याची खाण सापडल्यामुळे सर्वांचे लक्ष याठिकाणाकडेच लागले आहे.

Gold: भारतात 'या' ठिकाणी सापडला सोन्याचा साठा, जमिनीखाली आहे लाखो टन सोनं; नेमकं ठिकाण कुठे?
Gold Price Today: सोन्याला चकाकी! १० तोळा सोनं १,१०० रुपयांनी वाढले; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com