Gold Silver Prices Down Saam TV
बिझनेस

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं झालं स्वस्त, पाहा तुमच्या शहरात आजचा दर काय?

Gold Prices Fall by Rs 22, Silver Down by Rs 520: गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात गगनाला भिडलेले सोन्याचे दर अखेर काहीसे कमी झाले आहेत. सततच्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला बसणारा फटका आता थोडासा कमी होण्याची चिन्हं दिसत आहेत.

Bhagyashree Kamble

गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे भाव अगदी गगनाला भिडले होते. सोन्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीला ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला फटका बसला आहे. अशातच आज सोमवारी सोन्याच्या दरात किंचित घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर, चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऐन अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

आजचे सोने चांदीचे दर

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या दरात २२ रुपयांची घसरण झाली असून, प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ₹९४,९७० वर आला आहे. यापूर्वी सोन्याचा विक्रमी उच्चांक ₹९९,३५८ प्रति १० ग्रॅम इतका होता.

चांदीच्या किमतीतही आज घट झाली आहे. चांदीचा भाव प्रति किलो ५२० रुपयांनी घसरून ₹९६,०३७ वर पोहोचला आहे. चांदीचा आतापर्यंतचा सर्वाधिक दर ₹१,०४,०७२ प्रति किलो इतका होता.

राज्यातील प्रमुख शहरातील आजचा सोन्याचा भाव

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आर्थिक राजधानी मुंबईत २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८७, १८४ रूपये आहे. तर, २४ कॅरेट सोन्याची किंमत ९५, ११० प्रति १० ग्रॅम आहे.

तर, पुण्यात २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८७, १८४ रूपये आहे. तर, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ९५, ११० रूपये इतके आहे.

तसेच नागपुरात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८७, १८४ रूपये आहे. तर, २४ कॅरेट सोन्याचा दर ९५, ११० रूपये इतका आहे.

नाशकातही प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८७, १८४ रूपये आहे. तर, २४ कॅरेट सोन्याचा दर ९५, ११० रूपये इतका आहे.

सोन्याचा दर का घसरतो आहे?

अमेरिका चीन ट्रेड वॉर कमी झाल्यामुळे परदेशी बाजारातही सोन्याच्या किमतीत घसरण झालेली दिसून येत आहे. २७ एप्रिललाही सोन्याच्या दरात घसरण झाली होती आणि आजही ही घसरण कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Mhada Home: म्हाडाचे घर असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत | VIDEO

ST Bus : पुणे-मुंबई प्रवास महागला, एसटीच्या तिकिटात वाढ, पाहा कोणत्या शहराला जायला किती तिकिट? |VIDEO

Kendra Yog 2025: उद्या म्हणजेच दसऱ्याला 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ; गुरु-बुध बनवणार पॉवरफुल योग

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे ३६१ आमदारांचा निधी रखडला; सरकारी तिजोरीवर ताण; VIDEO

SCROLL FOR NEXT