gold news  saam tv
बिझनेस

Gold price : अवघ्या ६ मिनिटात सोनं ७,७०० रुपयांनी स्वस्त; सोन्याच्या दरात वर्षभरातील सर्वात मोठी घसरण

Gold price down : अवघ्या ६ मिनिटात सोनं ७,७०० रुपयांनी स्वस्त झालंय. सोन्याच्या दरात वर्षभरातील सर्वात मोठी घसरण झाली आहे.

Vishal Gangurde

अवघ्या ६ मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी स्वस्त

सोन्याच्या किमतीत विक्रमी १२,००० रुपयांची घसरण

चांदीच्या किमतीत देखील ₹26,500 पेक्षा अधिक घट

गुंतवणूकदारांचे नफा बुकिंग आणि मागणीतील घट हे प्रमुख कारण

सणासुदीत मागणीत झालेली घट, गुंतवणूकदारांच्या नफा बुकिंगमुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. देशातील वायदा बाजारात मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किमतीत अवघ्या ६ मिनिटांत ६ टक्के म्हणजेच ७७०० रुपयांची घसरण दिसून आली आहे. या पुढेही सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होऊ शकते, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

वायदा बाजारात सोन्याच्या किंमती १.१० लाख ते १.१५ लाख रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. तर सोन्याची किंमत विक्रमी उच्चांकावरून सुमारे १२ हजारांची घसरण झाली आहे.

गेल्या शुक्रवारी सोन्याचा भाव विक्रमी १,३२,२९४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला होता. मात्र बुधवारी तो घसरून १,२०,५७५ रुपयापर्यंत खाली आला. काही वेळाने, सांयकाळच्या सुमारास ५.४० वाजता सोन्याचा भाव आणखी घसरून १,२१,११८ रुपयांपर्यंत पोहोचला. एक दिवस आधी म्हणजे मंगळवारी हा भाव १,२८,२७१ रुपयांपर्यंत होता. त्यामुळे फक्त एका दिवसात सोन्याच्या भावात सुमारे ७,६९६ रुपयांची घसरण झाली.

चांदीच्या दरात घसरण

सोन्यासहित चांदीच्या किंमतीतही मोठी घसरण झालीये. भारतीय वायदा बाजारात चांदीचा दर ४ टक्क्यांनी घसरून १.४४ लाख रुपयापर्यंत खाली गेला. चांदीचा दर विक्रमी उच्चांकाशी तुलना करता २६,५०० रुपयांनी घसरला. बुधवारी चांदीच्या भावात ६,५०८ रुपयांची घसरण झालीये.

व्यापार सत्रादरम्यान चांदीचा भाव १,४३,८११ रुपयांपर्यंत घसरला. त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता चांदीचा सुरुवातीचा भाव १,४८,००० रुपये इतका होता.त्यानंतर दिवसअखेर १,५०,३२७ रुपयांवर बंद झाला. गेल्या शुक्रवारी चांदीचा विक्रमी भाव १,७०,४१५ रुपये प्रति किलो इतका होता. त्यानुसार, चांदीच्या दरात सुमारे ६ टक्क्यांनी किंवा २६,५९६ रुपयांनी घसरण झालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT