Gold price today in Jalgaon without GST saam tv
बिझनेस

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांनो, आजचे दर पाहाच! चांदी इतक्या हजाराने स्वस्त

Gold price today in Jalgaon without GST: पितृपक्षामुळे सोने-चांदीच्या मागणीवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. जळगावमध्ये सोने 1 लाख 48 हजार रुपये, तर चांदी 2 लाख 25 हजार रुपये प्रति किलोवर आली आहे.

Omkar Sonawane

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव: सध्या सुरू असलेल्या पितृपक्षामुळे सोने-चांदीची मागणी कमी झाली आहे. यामुळे सोने आणि चांदीचे भाव सातत्‍याने कमी होत आहेत. दरम्‍यान बुधवारी चांदीच्‍या भावात हजाराने वाढ झाली होती. यानंतर आज सोन्याचे दर स्थिर असून चांदीच्‍या भावात हजार हजार रूपयांची घसरण झाली आहे.

पितृपक्षात मौल्‍यवान वस्‍तू खरेदी करण्याचे टाळले जाते. यामुळे सुवर्ण बाजारात याचा परिणाम दिसून येत आहे. आठवडाभरापासूनच सोने आणि चांदीचे भाव सातत्‍याने कमी होत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्‍या बदलाचा परिणाम देखील सोन्या-चांदीच्या बाजारात होत असल्‍याचे दिसून येत आहे. गेल्‍या आठवडाभरापासून सोने आणि चांदीच्‍या भावात सातत्‍याने घसरण होत असून सोने 1लाख 50 हजारांच्या खाली आले आहे. तर चांदी देखील २ लाख ३० हजार रूपयांने घसरले आहे.

चांदीत हजाराची घसरण

आठवड्याच्‍या सुरुवातीलाच भाव खाली येत असून आज देखील भाव कमी झाले आहेत. दरम्‍यान बुधवारी (ता.७) सोन्याचा भाव एक लाख ४८ हजार रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. आज सोन्‍याचे भाव स्‍थीर राहिले आहेत. मात्र चांदीचा भाव 2 लाख २६ हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवर होता. त्यात हजार रूपयांची घसरण होऊन चांदी 2 लाख २५ हजार रुपयांपर्यंत खाली आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अडीच कोटींची देयकं,कर्जाचा डोंगर अन् कंत्राटदाराचा टोकाचा निर्णय; अमरावतीत खळबळ

Kangana Ranaut: भाजप खासदार कंगणा रणौत यांची हायकोर्टात धाव, अश्लील एआय कंटेंटबाबत काय म्हणाली?

Maharashtra News Live Update: राहुल-प्रियंका गांधी राजघाटावर पोहोचले

Toxic Wife Signs : तुमचीही पत्नी टॉक्सिक आहे का? ही आहेत लक्षणे

Nana Patekar Real Name: नाना पाटेकरांना 'नाना' का म्हणायचे? त्यांचे खरे नाव काय?

SCROLL FOR NEXT