Todays Gold Price Saam Tv
बिझनेस

Gold Price Today : सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा 22k, 24k सोन्याचे प्रति तोळा दर...

24k, 22k gold rate today Mumbai pune delhi : आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ₹१,६३,३१० वर पोहोचला असून २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

Gold price today in India 22k and 24k rate per tola: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत चढ उतार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सतत बदल होत असल्याचे दिसत आहे. याचा परिणाम भारतामधील गोल्ड मार्केटवरही होत आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत (latest gold rates in Mumbai Delhi Pune today) बदल झाला. २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीमध्ये प्रति तोळा ९३० रूपयांची वाढ झाली आहे. आज सोन्याची किंमत प्रति तोळा ₹1,63,310 इतकी झाली आहे.

भारतातील सोन्याचा दर (प्रति ग्रॅम)

भारतातील २४ कॅरेट सोन्याचा (९९.९% शुद्धता) भाव प्रति ग्रॅम १६,३३१ रुपये इतका झाला आहे. बुधवारच्या तुलनेत यामध्ये ९३ रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा (९१.६% शुद्धता) भाव प्रति ग्रॅम ८५ रूपयांनी वाढून १४,९७० रुपयांवर आला आहे.१८ कॅरेट सोन्याच्या (७५% शुद्धता) किंमतीमध्येही ६९ रूपयांची वाढ झाली असून ताजे दर प्रति ग्रॅम १२,२४८ रुपये इतके आहेत.

भारतातील सोन्याचा दर (प्रति तोळा)

२४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १,६३,३१० रुपये इतकी झाली आहे. मंगळवारी गोल्ड मार्केट बंद झाल्यानंतर आज यामध्ये प्रति तोळा ९३० रुपयांनी वाढ झाली.२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,४९,७०० रुपये झाली. यामध्ये ८५० रूपयांची वाढ नोंदण्यात आली. १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा ६९० रूपयांनी वाढून १२२४८० रूपयांवर पोहचली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ नोंदलवली जात आहे. युद्धामुळे सोन्याचे दर वारंवार बदलत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितलेय.

तुमच्या शहरातील सोन्याचे दर काय आहेत?

चेन्नई

24k -₹16,495

22k - ₹15,120

18k - ₹12,950

मुंबई

24K: ₹16,331

22K: ₹14,970

18K: ₹12,248

दिल्ली

24K: ₹16,346

22K: ₹14,985

18K: ₹12,263

पुणे

24K: ₹16,331

22K: ₹14,970

18K: ₹12,248

अहमदाबाद

24K: ₹16,336

22K: ₹14,975

18K: ₹12,253

कोलकाता

24K: ₹16,331

22K: ₹14,970

18K: ₹12,248

हैदराबाद

24K: ₹16,331

22K: ₹14,970

18K: ₹12,248

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: या राशींच्या आज मनातील इच्छा होतील पूर्ण; वाचा राशीभविष्य

होर्मुजमधल्या केबल्सवरुन इराणचा इशारा, तेलाच्या आगीत इंटरनेटची ठिणगी?

Maharashtra News Live Update: सागर नाईक यांनी भर सभेत महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांना सुनावले खडेबोल

ट्रम्प यांनी ओकली भारताविरोधात गरळ, ट्रम्प यांच्याकडून भारताचा नरक असा उल्लेख

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

SCROLL FOR NEXT