Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Pirce: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं महागलं, २४-२२ आणि १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर किती?

Gold- Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आज सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती आहेत ते घ्या जाणून...

Priya More

Summary -

  • दिवाळीनंतर सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली

  • आज २४ कॅरेटचं १० तोळा सोनं १७० रुपयांनी महागलं

  • २२ कॅरेट सोनं १५० रुपयांनी वाढले

  • १८ कॅरेट सोनं देखील १३० रुपयांनी महागले

  • तर चांदीच्या दरात प्रति किलो २,००० रुपयांनी वाढ झाली

दिवाळीनंतर सोनं-चांदींच्या दरामध्ये सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोन्याचे दरात वाढ होतच चालली आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १७०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीमध्ये २ रुपयांनी वाढ झाली आहे. सोनं-चांदी खरेदी करायचे असेल तर तुम्ही एकदा आजचे दर नक्की वाचा...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १७० रुपयांनी वाढले आहेत. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,२३,१७० रुपये खर्च करावे लागणार आहे. हे सोनं काल १,२३,००० रुपयांना विकले गेले. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,७०० रुपयांनी वाढ झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,३१,७०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हेच सोनं काल १२,३०,००० रुपयांना विकले गेले. सोन्याच्या दरात झालेली वाढ ही जरी कमी असली तरी देखील ग्राहकांच्या खिशावर ताण येणार आहे.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१२,९०० रुपये मोजावे लागणार आहे. हे सोनं काल १,१२,७५० रुपयांना विकले गेले. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १,५०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,२९,००० रुपये खर्च करावे लागतील. हेच सोनं काल ११,२७,५०० रुपयांना विकले गेले.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाल्याचे दिसत आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १३० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९२,३८० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हे सोनं काल ९२,२५० रुपये खर्च करावे लागले. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,३०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,२३,८०० रुपये मोजावे लागणार आहेत. काल हेच सोनं खरेदीसाठी ९,२२,५०० रुपयांना विकले गेले.

सोन्यासोबतच चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्यासोबत चांदी खरेदीसाठी ग्राहकांना जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. आज १ ग्रॅम चांदीच्या दरामध्ये २ रुपयांमध्ये वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी १५४ रुपये मोजावे लागणार आहेत. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये २००० रुपयांनी वाढ झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १,५४,००० रुपये खर्च करावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT