Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Gold-Silver Rate Today: सोनं- चांदी खरेदीची आज सुवर्णसंधी आहे. सोन्याच्या दरात आज घसरण झाली. तर चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी वाचा दर किती आहेत.?

Priya More

Summary -

  • सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले

  • २४ कॅरेट सोनं १०० रुपयांनी झाले कमी

  • २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील घसरण

  • चांदीच्या दरात कोणताही बदल नाही

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी आणि आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. चांदीच्या दरात काहीच बदल झालेला नाही. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी आहे. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १०० रुपयांनी घसरण झाली आहे. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती आहेत ते घ्या जाणून...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात घट झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १० रुपयांनी कमी झाले आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,२२,०१० रुपये खर्च करावे लागणार आहे. हे सोनं शुक्रवारी १,२२,०२० रुपयांना विकले गेले होते. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १०० रुपयांनी घट झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,२०,१०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हेच सोनं शुक्रवारी १२,२०,१०० रुपयांना विकले गेले होते. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाल्यामुळे ग्राहकांचा सोनं खरेदीकडे कल दिसत आहे.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,११,८४० रुपये मोजावे लागणार आहे. हे सोनं शुक्रवार १,११,८५० रुपयांना विकले गेले. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १०० रुपयांची घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,१८,४०० रुपये खर्च करावे लागतील. हेच सोनं शुक्रवारी ११,१८,५०० रुपयांना विकले गेले होते.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ १८ कॅरेटच्या सोन्याचे दर आज कमी झाले आहेत. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात देखील १० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९१,५१० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हे सोनं शुक्रवारी ९१,५२० रुपये खर्च करावे लागले. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये देखील १०० रुपयांची घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,१५,१०० रुपये मोजावे लागणार आहेत. शुक्रवारी हेच सोनं ९,१५,२०० रुपयांना खरेदी करावे लागले.

दरम्यान, आज चांदीच्या दरात काहीच बदल झाले नाहीत. आज १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी १५२.५० रुपये मोजावे लागणार आहेत. तर १ किलो चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १,५२,५०० रुपये खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे आज सोन्यासोबत चांदी खरेदी करण्याची तुमच्यासाठी चांगली संधी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घात की अपघात?'६ जणांचा मृत्यू,मग प्रत्यक्षात ५ बॉडीच का?' आमदाराच्या मनात शंकांचं काहूर

लग्नाच्या पहिल्या रात्री चुकूनही या ५ गोष्टी करू नका; अन्यथा...

कमळ-धनुष्यबाणालाचा निधी मिळणार; मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, VIDEO

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा पक्षाला 'जय महाराष्ट्र '

पैसे सुट्टे देणे-घेण्यावरून वाद टोकाला गेला; ग्राहक आणि रिक्षाचालकामध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT