Gold Price Today; 22 Dec 2025 Gold Rates : वर्षाच्या अखेरीसही सोन्याच्या किंमतीमधील वाढ सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आर्थिक अस्थिरता, राजकीय तणाव आणि पुढील वर्षी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात होण्याच्या शक्यतेमुळे सोन्याची खरेदीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतत वाढ नोंदवण्यात आली आहे. देशांतर्गत मार्केटमध्येही सोन्याला चार दिवसांपासून झळाळीच मिळत आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ नोंदवण्यात आली. सलग चौथ्या दिवशी सोनं महागलेय. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ३२० रूपयांनी वाढली आहे. दिल्लीपासून ते मुंबई आणि पुण्यापासून चेन्नई आणि कोलकात्यामध्ये सोन्याचे दर बदलले आहेत.
Gold Rate Today देशात आज सोन्याचे दर -
राजधानी दिल्ली आणि मुंबईमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹१३,९४० , २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹१२,७८० आणि १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹१०,४५९ आहे. मागली काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवण्यात आली आहे. चांगला परतावा मिळत असल्याने अनेकजण सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत.
देशात आज २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ३२ रूपयांनी वाढली आहे. तर २२ कॅरेट सोनं ३० रूपयांनी वाढलेय. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १२७६५ रूपये इतकी आहे. तर १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम २४ रूपयांनी वाढली आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १०४४४ रूपये इतक्या रूपयांना मिळत आहे.
जागतिक आर्थिक मंदीची शक्यता, सोने-चांदीची वाढती मागणी आणि लग्नसराईमुळे देशांतर्गत मागणी वाढल्याने सोन्याचे दर वाढले आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की, परिस्थिती असेच राहिली तर सोने आणि चांदीचे दर आणखी वाढू शकतात. सोन्याच्या किंमतीत आज पुन्हा वाढ झाली. दिल्ली, जयपूर आणि लखनौमध्ये दर सर्वाधिक आहेत, तर मुंबई आणि कोलकात्यात थोडे कमी आहेत. देशातील प्रमुख शहरातील सोन्याच्या प्रति तोळा किंमती जाणून घेऊयात..
दिल्ली
२४ कॅरेट सोने: ₹१,३९,४००
२२ कॅरेट सोने: ₹१,२७,८००
मुंबई
२४ कॅरेट सोने: ₹१,३९,२५०
२२ कॅरेट सोने: ₹१,२७,६५०
कोलकाता
२४ कॅरेट सोने: ₹१,३९,२५०
२२ कॅरेट सोने: ₹१,२७,६५०
लखनौ
२४ कॅरेट सोने: ₹१,३९,४००
२२ कॅरेट सोने: ₹१,२७,८००
जयपूर
२४ कॅरेट सोने: ₹१,३९,४००
२२ कॅरेट सोने: ₹१,२७,८००
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.