Gold Price Today Saam Tv News
बिझनेस

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी वाढ, प्रति तोळ्याला 'इतकी' किंमत; चांदी ८००० हजारांनी वाढली

Gold price today 14 December India city-wise list : देशात पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठलाय. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईत लोकांना मोठा फटका बसणार आहे.

Namdeo Kumbhar

City wise gold and silver price list : देशात पुन्हा एकदा सोनं अन् चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवडाभरात सोन्याला आणि चांदीला झळाळी मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे, त्यातच सोने, चांदीच्या दरात ऐतिहासिक वाढ झाली आहे. मागील आठवडाभरात चांदीचे दर प्रति किलो ८ हजार रूपयांनी वाढले आहेत. तर सोन्याच्या दरातही ३७७० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, जळगाव अन् दिल्लीसह देशात सोन्याच्या दरात वाढ होत आहे. सोमवारी सराफा बाजार उघडताच सोन्याचा दराकडे ग्राहकांच्या नजरा असतील. डॉलरच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे सोन्याचे दर वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. जागतिक बाजरासोबत देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. (Gold Price Surges Sharply Across India)

भारतात सोन्याच्या किमती प्रत्येक आठवड्याला बदलत आहेत. जागतिक बाजारातील अस्थिरता अन् डॉलरच्या वाढत्या किंमतीमुळे सोन्याच्या दरात बदल होत आहे. मागील आठवड्यात २४ कॅरेट सोन्याने ३७७० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या किमतीत ३,४५० रुपयांची वाढ झाली आहे. १४ डिसेंबर रोजी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा १,३४,०७० रुपये होता. पुणे, मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १२२७५० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १३३९१० रुपये आहे.

अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केल्यानंतर सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली. त्यात रूपयांची घसरणही सुरूच आहे. परिणामी सोने आणि चांदीमधील गुंतवणूक वाढली. त्यामुळे किमतीमध्येही वाढ नोंदवण्यात आली आहे. फेडरल बँकेने प्रमुख व्याजदरात कपात केल्याने बाँड उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे कल केलाय. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत या वर्षी आतापर्यंत ६५% वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत या वर्षी आतापर्यंत अंदाजे ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

चांदीची किंमत कितीने वाढली ?

एकीकडे सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होत असतानाच सराफा बाजारात चांदीनेही भाव खाल्ला. गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात चढ उतार पाहयला मिळाली. पण आठवडाभरात चांदीची किंमत प्रति किलो ८ हजार रूपयांनी वाढल्याची नोंद झाली. आज चांदीची किंमत प्रति किलो १९८००० हजार रूपये इतकी नोंदवण्यात आली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची स्पॉट किंमत प्रति औंस $64.57 वर पोहोचली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT