Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला! १० तोळ्याच्या दरात २८०० रुपयांनी वाढ, आजचा दर किती?

Gold-Silver Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात २८० रुपयांनी वाढ झाली आहे. आजचे दर किती आहेत ते घ्या जाणून....

Priya More

सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वाढ व्हायला सुरूवात झाली आहे. सोन्याच्या दर एक लाखांपार गेले आहेत. त्यामुळे लग्नसराईसाठी सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. आज पु्न्हा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रती तोळा २८० रुपयांनी वाढ झाली आहे.

तर १० तोळे सोन्याच्या दरात २,८०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करताना आता ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहे. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी जाणून घ्या आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

गुडरिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा २८० रुपयांनी वाढ झाली आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी १,०१,६८० रुपये मोजावे लागणार आहे.

शुक्रवारी २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी १,०१,४०० रुपये खर्च करावे लागले. तर हेच २४ कॅरेटचे १० तोळे सोन्याच्या दरामध्ये २,८०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी १०,१६,८०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा २५० रुपयांनी वाढ झाली आहे. २२ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी ९३,२०० रुपये मोजावे लागणार आहेत. २२ कॅरेटचे १० तोळे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९,३२,००० रुपये खर्च करावे लागतली.

तर १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा २१० रुपयांनी वाढ झाली आहे. १८ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ७६,२६० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर आज भारतात चांदीची किंमत प्रति ग्रॅम ११० रुपये आणि प्रति किलोग्रॅम १,१०,००० रुपये इतकी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shepu Batata Bhaji Recipe: पौष्टिक शेपू बटाटा भाजी कशी बनवायची?

प्रचारादरम्यान भाजपचा पैशांचा पाऊस, शिंदे गटाच्या नेत्यांनी रांगेहाथ पकडले, निवडणूक आयोगाचे पथक घटनास्थळी दाखल|VIDEO

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये पैसे वाटपावरून भाजप पदाधिकारी आणि काँग्रेस उमेदवारामध्ये राडा

Pune Police: पुण्यात वाहतूक पोलिसाची आत्महत्या, सुसाईड नोटमधून धक्कादायक कारण समोर

Chanakya Niti: कर्ज घेण्यापूर्वी चाणक्यांचे हे 3 नियम जाणून घ्या; वाद आणि आर्थिक संकट टळेल

SCROLL FOR NEXT