Gold Rate Today google
बिझनेस

Gold Rate Today: चांदीत ₹५ हजारांची वाढ, सोन्याची किंमतही बदलली, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

Gold Price India: जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं पुन्हा महागलं असून एका दिवसात ३५०० आणि चांदीत ५००० रुपयांची वाढ झाली आहे. ताजे सोनं-चांदीचे दर आणि वाढीमागची प्रमुख कारणे जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरातले चढ-उतार कायम सुरू असून जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. १ जुलै रोजी घसरलेले सोन्या - चांदीचे दर फक्त दोन दिवसांमध्ये पुन्हा वाढलेले आहेत. आज ३ जुलै २०२६ रोजी सोन्याच्या दरात तब्बल ३,५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात ५,००० रुपयांची वाढ झालेली आहे.

जून महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये सोनं-चांदीच्या किंमतीत काहीशी घसरण पाहायला मिळाली होती. त्यानंतर १ जुलै रोजी सोनं हे १५०० रुपयांनी स्वस्त झालं होतं, तर चांदीच्या दरातसुद्धा घट झाली होती. पण बाजारातल्या वाढलेल्या मागणीमुळे आणि जागतिक घडामोडींचा परिणाम म्हणून दर पुन्हा वाढले आहेत.

आजचा सोनं-चांदीचा भाव (Today Gold Rate)

२२ कॅरेट १ तोळं सोन्याची किंमत - १४३१९५

२४ कॅरेट १ तोळं सोन्याची किंमत - १४६५००

चांदी प्रति किलो - २३८०००

२७ जून रोजी प्रति ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ४३ हजार २०० रुपये होता. त्यानंतर दरात घसरण होत १ जुलै रोजी १ लाख ४० हजार रुपयांपर्यंत खाली आला. पण पुढच्या दोन दिवसांमध्ये बाजारात पुन्हा तेजी दिसली आणि ३ जुलै रोजी सोन्याचा दर थेट १ लाख ४६ हजार ५०० रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरांमध्ये अशीच स्थिती पाहायला मिळाली. २७ जून ते ३० जूनदरम्यान चांदीचा दर २ लाख २७ हजार रुपयांवर पोहोचला.

सराफा व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातल्या घडामोडी, डॉलरच्या दरातले बदल आणि गुंतवणूकदारांची वाढती मागणी यामुळे सोनं-चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. त्यामुळे सोनं किंवा चांदी खरेदी करण्याआधी ग्राहकांनी ताजे बाजारभाव तपासूनच व्यवहार करावेत, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT