२०२५ मध्ये सोन्याचे दर सर्वाधिक वाढले
मागच्या वर्षी सोन्याचे दर किती होते?
सोन्याचे दर कितीने वाढले?
सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत, असं म्हणायला हरक नाही. सोन्याच्या दरात मागच्या वर्षभरात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. सोन्याचे दर इतिहासात कधीही एवढे जास्त वाढले नव्हते. सोन्याचे दर या वर्षभरात कदाचित फक्त एकदाच घसरले होते परंतु त्यानंतरही हे दर पुन्हा वाढले. आज सोन्याचे दर १,३५,८८० रुपये आहेत. हेच दर एका वर्षाआधी म्हणजे १ जानेवारी २०२५ रोजी ७८,००० रुपये होते.
वर्षभरात सोन्याचे दर ६० हजारांनी वाढले (How Much Gold Price Hike in 2025 Year)
सोन्याचे दर २०२५ मध्ये सर्वाधिक वाढले आहेत. सोन्याचे दर वर्षभरात जवळपास ५७,८८० रुपयांनी वाढले आहेत. २०२५ च्या सुरुवातीला सोन्याचे दर ७८००० रुपये होते. त्यानंतर हे दर वाढतच गेले. आतापर्यंत एकदाही सोन्याचे दर जास्त दिवसांसाठी कमी झालेले नाहीत. सोन्याचे दर काही दिवसात दीड लाख होती. सोन्याच्या किंमती अशाच वाढण्याची शक्यता आहे.
जानेवारी २०२५ सोन्याचे दर किती होते? (1st january 2025 Gold Price)
जानेवारीत सोन्याचे दर ७८००० रुपये प्रति तोळा होते. तेव्हापासून पुढचे काही दिवस सोन्याचे दर स्थिर होते. पण त्यानंतर हे दर वाढायला सुरुवात झाली.
मार्चमध्ये सोन्याच्या किंमती किती होत्या? (March 2025 Gold Price)
मार्च महिन्यात सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ८६६२ रुपये होते. जवळपास २ महिन्यात हे दर १० हजारांनी वाढले होते. फेब्रुवारीत सोन्याच्या किंमती ८४४९० रुपये होते.
मे महिन्यात सोन्याचे दर किती होते? (May 2025 Gold Price)
मे महिन्यात सोन्याचे दर ९५७३० रुपये होते. या कालावधीतदेखील सोनं १०,००० रुपयांनी महागलं होतं. जानेवारी ते मे अशा पाच महिन्यात सोन्याचे दर जवळपास २०,००० रुपयांनी वाढले होते.
जुलैमध्ये सोन्याचे दर किती होते? (July Gold Rate)
जुलै महिन्यात सोन्याचे दर ९८४०० रुपये प्रति तोळा होते. मे ते जुलै या कालावधीत सोन्याचे दर सर्वाधिक कमी वाढले होते. त्यामुळे या काळात ज्यांनी सोने खेरदी केले असेल त्यांना खूप फायदा झाला असेल.
सप्टेंबर २०२५ मधील सोन्याच्या किंमती किती होत्या? (September 2025 22k and 24k Gold Rate)
सप्टेंबर महिन्यात सोन्याचे दर १,०४५९० रुपये प्रति तोळा होते. सप्टेंबर महिन्यात सोनं पहिल्यांदा १ लाखांपेक्षा जास्त झालं होतं.
नोव्हेंबरमध्ये १ तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागले? (Novemebr 2025 Gold Price)
नोव्हेंबरमध्ये सोन्याचे दर १,२३,२८० रुपये होते. हे दर जवळपास २० हजारांनी वाढले होते. मागच्या वर्षात सोन्याच्या किंमती सर्वाधिक सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत वाढलया होत्या.
डिसेंबरमध्ये सोन्याचे दर? (December 2025 Gold Rate)
डिसेंबरमध्ये सोन्याचे दर सर्वाधिक वाढले होते. आतापर्यंतचे सर्वात जास्त सोन्याची किंमत २८ डिसेंबर रोजी होती. या दिवशी प्रति तोळा सोनं १,४२,४२० रुपये होते.म्हणजेच सोन्याचे दर १ लाख ४० हजारांपेक्षा जास्त होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.