आज सोन्याचे दर स्थिर
२४ कॅरेट सोन्याच्या दरात काल २,८९० रुपयांची घसरण
गेल्या सात दिवसांत २४ कॅरेट सोन्याचा भाव ४,८५० रुपयांनी कमी
चांदीचे भाव सलग दुसऱ्या दिवशी स्थिर
गेल्या अनेक दिवसांपासून सुवर्ण बाजारात सोन्याने उसळी मारली होती. मात्र सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस काहीसा दिलासादायक आहे. कारण आज सोन्या-चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. एका दिवसाच्या घसरणीनंतर आज सोन्याचे दर स्थिर राहिले आहेत. तर चांदीचे भावही सलग दुसऱ्या दिवशी स्थिर आहेत.
सोन्याच्या दराचा विचार केला तर, एका दिवसाच्या घसरणीनंतर आज २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचे भाव स्थिर आहेत. काल १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल २८९० रुपयांची घसरण झाली होती. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोन्याचा भावही २,६५० ने कमी झाला होता.
गेल्या सात दिवसांचा आढावा घेतला तर सोन्याच्या दरात चांगलीच चढ-उतार पाहायला मिळाली. या कालावधीत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ४,८५० ने कमी झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात ४४५० ची घसरण नोंदवण्यात झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीत मागील काही दिवसांत मोठी अस्थिरता दिसून आली आहे.
चांदीचे दरही सलग दुसऱ्या दिवशी स्थिर आहेत. यापूर्वी सलग सहा दिवस चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. त्यानंतर २८ ऑगस्ट रोजी एक किलो चांदीच्या भावात ५००० ची घसरण झाली होती. याआधी चांदीच्या दरात मोठी वाढही पाहायला मिळाली होती. सलग दोन दिवसांत एक किलो चांदी तब्बल १०,५०० ने महागली होती. त्यापूर्वी १९ ऑगस्ट रोजी चांदीच्या भावात ५,००० ची घसरण झाली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांत चांदीच्या बाजारातही सातत्याने चढ-उतार होत असल्याचे दिसते. आज मुंबईमध्ये एक किलो चांदीचा भाव २,५५,००० प्रति किलो आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.