Gold Price Saam Tv
बिझनेस

Gold Price: 'या' १० कारणांमुळे सोनं होतेय स्वस्त; दिवाळीनंतर तब्बल ₹१०,३७० नी घसरण, आता गोल्ड खरेदी करणं योग्य?

Gold Rate Fall Reasons: सोन्याचे दर दिवाळीपासून सतत घसरताना दिसत आहे. सोन्याचे दर घसरण्यामागे अनेक कारणे आहेत. यामुळे पुढील काही दिवसात सोन्याचे दर अजून घसरण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दर घसरले

मागील १२ दिवसांत सोन्याच्या दरात साडे दहा हजारांनी घसरण

सोन्याचे दर घसरण्यामागची कारणे

सोने आणि चांदीचे दर घसरत आहेत. मागच्या महिन्यात सोने-चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. त्यानंतर आता दिवाळीपासून सोने-चांदीच्या दरात सलग घसरण होताना दिसत आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सोन्याचे दर घसरत आहेत. १८ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरपर्यंत सोन्याचे दर घसरले आहे.

मागील १२ दिवसात सोन्याचे दर १०३७० रुपयांनी घसरले आहे. दरम्यान, पुढील काही दिवसात हे दर ५ ते १० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २८ ऑक्टोबर रोजी सोन्याचे दर १३२७८० रुपये प्रति तोळा होते. त्यानंतर आज ३० ऑक्टोबरला हे दर १२२४१० रुपये आहेत. सोन्याचे दर जवळपास साडे दहा हजारांनी घसरले आहेत. सोन्याचे दर का घसरलेत यामागची कारणे जाणून घ्या.

सोन्याचे दर घसरण्याची कारणे (Gold Rate Fall Reasons)

1.ट्रम्प आणि जिनपिंग यांच्या बैठकीनंतर अमेरिका आणि चीनमध्ये ट्रेड डील होण्याची शक्यता

2. सुरक्षित गुंतवणूकीसाठी डॉलरची किंमत वाढणे

3. अमिरेकेचे भारत, कोरिया आणि इतर देशांसोबत ट्रेड करार होण्याची शक्यता

4. सोन्याच्या दरात ५० टक्क्यांनी वाढल्याने गुंतवणूकदारांना फायदा होतोय

5. फेडरल रिझर्व्ह बँकेच्या पाठोपाठ जपान आणि युरोपियन सेंट्रल बँकेतील व्याजदरात कपात

6. सणासुदीनंतर मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात वाढ

7. ज्यांनी सोन्याचे दर कमी असताना गुंतवणूक केले ते सध्या जास्तीत जास्त विक्रीकडे वळत आहे

8. अमेरिकेतीन कमी व्याजदरामुळे गुंतवणूकदारांची बॉन्ड्समध्ये जास्त गुंतवणूक

9. मध्यवर्ती बँकांकडून सोने खरेदीचा जोर

10. लग्नाचे मूहूर्त २ नोव्हेंबरपासून आहेत त्यामुळे ज्यांना सोने घ्यायचे आहे त्यांनी आधीच घेतले असेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT