लग्नसराईला सुरुवात झाली असून या दिवसांत सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळालं होतं. तर आज म्हणजेच १८ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात पुन्हा एकदा घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय.
गेल्या एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या देशांतर्गत किमती 3700 रुपयांनी घसरल्या होत्या. मनी कंट्रोलच्या माहितीनुसार, आज दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 75790 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आलाय. जाणून घेऊया देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत काय आहे.
सध्या मुंबई, कोलकात्यामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेटची किंमत 69,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
अहमदाबाद आणि भोपाळमध्ये 22 कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत 69,390 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
लखनऊमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेटची किंमत 69,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
विशाखापट्टणममध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेटची किंमत 69,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.