विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. पण बीडच्या आष्टी मतदारसंघामध्ये प्रचाराला वेगळाच रंग आला आहे. याठिकाणी प्रचारादरम्यान डुक्कर मारण्याची अजब चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघामध्ये डुक्कराची चर्चा कायम आहे.
बीडमध्ये आमदार कोण होणार यासाठी स्पर्धा लागली आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मला आमदार करा असे आवाहन जनतेला करत आहे. आष्टीतील प्रचारसभेमध्ये आमदार बाळासाहेब आजबे यांनी 'मी पिंजरा आणून देतो, तुम्ही त्यांना डुक्कर धरायला ठेवा.', असे वक्तव्य करत विरोध पक्षातील उमेदवारावर निशाणा साधला आहे.
आमचे विरोधी उमेदवार हे डुक्कर धरायला पिंजरा आणतो म्हणाले. पण आमदाराचे हे काम नसते. पण ते जर हे काम करणार असतील तर मी ऑस्ट्रेलियावरून पिंजरा आणून देतो.तुम्ही त्यांना डुक्कर धरायला ठेवा आणि मला आमदार करा, असं वक्तव्य आष्टी मतदार संघाचे आमदार तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांनी केले आहे. आष्टी तालुक्यातील कडा येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
आष्टी मतदार संघाचे भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी प्रचार सभेमध्ये 'तुम्ही मला निवडून द्या मी तालुक्यातील सर्व डुक्कर मारतो.', असे आश्वासन दिले होते. त्यानंतर 'तुम्ही डुक्कर मारायचे काम मन लावून करा, इथं तर शिट्टीच वाजणार.', असा सल्ला बंडखोर उमेदवार भीमराव धोंडे यांनी दिला होता.
त्यानंतर आता बाळासाहेब आजबे यांनी 'मतदारांनी मला आमदार करावे आणि त्यांना डुक्कर धरायला ठेवा.', असे म्हटले आहे. दरम्यान यामुळे डुक्करांच्या चर्चेत आष्टी मतदार संघातील प्रचाराची सुरुवात अन् समारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.