Beed Politics: मला आमदार करा, एका वर्षात सगळे डुक्कर मारून टाकतो; भाजप उमेदवाराचे विधान

Suresh Dhas Big Statement: 'मला आमदार करा, एका वर्षात सगळे डुक्कर मारून टाकतो.', असं वक्तव्य भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी केले आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Beed Politics: मला आमदार करा, एका वर्षात सगळे डुक्कर मारून टाकतो; भाजप उमेदवाराचे विधान
Suresh DhasSaam tv
Published On

विनोद जिरे, बीड

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. राज्यभरात प्रचारसभांचा धडाका सुरू आहेत. यावेळी सत्तेत आल्यानंतर काय काय केलं जाईल याबाबतची आश्वासनं महायुती आणि महाविकास आघाडीकडून मतदारांना दिली जात आहेत. त्याचसोबत उमेदवार देखील मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आश्वासनं देत आहेत. अशामध्ये बीडमधील भाजपच्या उमेदवाराने तर नागरिकांना अजब आश्वासन दिले आहे. 'मला आमदार करा, एका वर्षात सगळे डुक्कर मारून टाकतो.', असं वक्तव्य भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी केले आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

परळीचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या अजब आश्वासनानंतर आता महायुतीचे आष्टी मतदार संघाचे उमेदवार सुरेश धस यांनी मतदारांना एक अजब आश्वासन दिले आहे. 'आपल्याकडे डुकरांची संख्या वाढली आहे यामुळे शेतकरी त्रस्त झालेत. या आधी मी पंकजा मुंडे मंत्री असताना त्यांच्या वाढदिवसानिमित्त डुक्कर मारण्यासाठी नवाब हा शूटर आणला होता. आता सुद्धा डुक्कर मोठ्या संख्येत वाढले आहेत. त्यामुळे मला आमदार करा. एक वर्षात हे सगळे डुक्कर मारून टाकतो.', असे अजब सुरेश धस यांनी दिले आहे. त्यांच्या या सभेची जोरदार चर्चा रंगली आहे.

Beed Politics: मला आमदार करा, एका वर्षात सगळे डुक्कर मारून टाकतो; भाजप उमेदवाराचे विधान
Maharashtra Politics: मुंबईत रिपाईला मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली आठवलेंची साथ; ठाकरे गटाची ताकद वाढणार

दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराने मतदारांना अजब आश्वासन दिलं होतं. शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी 'जर मी आमदार झालो तर सर्व पोरांची लग्न करुन देईल.', असं आश्वासन दिले होते. त्यांच्या या आश्वासनाची जोरदार चर्चा रंगली आहे. परळी विधानसभा मतदारसंघामध्ये राजेसाहेब देशमुख हे धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.

Beed Politics: मला आमदार करा, एका वर्षात सगळे डुक्कर मारून टाकतो; भाजप उमेदवाराचे विधान
Maharashtra Politics: मविआच्या नेत्यांचे फोटो वापरले, ठाकरे गटाची शेकापविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com