Gold Price Today google
बिझनेस

Gold Rate Today India : सोन्याचा भाव पुन्हा घसरला! 7 दिवसांत सोनं इतक्या रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे ताजे दर

24K Gold Price : गेल्या सात दिवसांमध्ये सोन्याच्या दरात मोठी घट झाल्यानंतर आज सोनं-चांदीचे दर स्थिर आहेत. प्रमुख शहरातले ताजे दर, बाजारातल्या घडामोडी आणि खरेदीआधी जाणून घ्या महत्त्वाची माहिती.

Sakshi Sunil Jadhav

सलग काही दिवस सोनं-चांदीच्या दरामध्ये चढ- उतार झाल्यानंतर आज १९ जुलै रोजी यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. मागच्या सात दिवसांमध्ये २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या किमतीत १,०४० तर २२ कॅरेट सोन्यात ९५० ची घट झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातल्या वाढलेल्या तणावामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. तसेच अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता असल्याने सोन्यासारख्या गुंतवणूक पर्यायांवर दबाव आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमती कमी झाल्या.

आज देशातल्या प्रमुख शहरांमध्ये १८, २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर स्थिर आहेत. त्यामुळे ग्राहकांना कालच्या तुलनेत त्याच दरात सोनं खरेदी करता येणार आहे. खरेदी करण्याआधी आपल्या शहरातली अधिकृत दर तपासून घेणं आवश्यक आहे.

चांदीच्या दरातही आज कोणताही बदल झालेला नाही. याआधी ११ जून रोजी चांदीच्या दरात प्रतिकिलो ५००० रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर काही दिवस दर स्थिर राहिले.१७ जुलै रोजी पुन्हा ५००० ची घट झाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही चांदीचे दर स्थिर आहेत.

सध्या दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे एक किलो चांदीचा दर २,३०,००० आहे. तर चेन्नईमध्ये चांदीचा दर २,३५,९०० प्रति किलो असून, या प्रमुख शहरांमध्ये सर्वात जास्त दर चेन्नईमध्ये नोंदवला गेलेला आहे. सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दररोजचे बाजारभाव तपासूनच निर्णय घेणं फायदेशीर ठरू शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FIFA prize money: स्पेन मालामाल! वर्ल्डकप हरूनही मेस्सीच्या अर्जेंटिनावर कोट्यवधींचा पाऊस; प्रत्येक टीमवर फिफाने किती केली पैशांची बरसात?

FIFA World Cup 2026 : फायनल सामन्यात मेस्सीची जादू पडली फिकी; फेरान टोरेसच्या निर्णायक गोलने स्पेनने 16 वर्षांनी जिंकला वर्ल्डकप

IND vs ENG: रोहितचे शतक व्यर्थ; अवघ्या ८ चेंडूंमध्ये सामन्याचा निकाल बदलला; आठ वर्षांनंतर इंग्लंडनं मालिका जिंकली

प्रशासकीय सेवेत मोठे फेरबदल! IAS अधिकारी अन् तहसीलदारांच्या बदल्या; कोणाची कुठे झाली नियुक्ती?

लॉर्ड्सवर हिटमॅनचे वादळ! इंग्लंडविरुद्ध रोहित शर्माचे वादळी शतक, असा पराक्रम करणारा पहिला भारतीय

SCROLL FOR NEXT