16 Psyche Asteroid and Banswara Gold Mine Future of Gold Prices Could Change Forever Saam Tv
बिझनेस

लाखांचं सोनं 100 रुपयांवर येणार? सोन्याची किंमत का घसरणार?

16 Psyche Asteroid and Banswara Gold Mine: सोनं दीड लाखांच्या घरात गेलेलं असताना सोन्याची किंमत झरझर खाली येण्याची शक्यता आहे. त्याला शास्त्रज्ञांचा एक शोध कारणीभूत आहे.

Girish Nikam

सोन्याचे भाव गगनाला भिडले असतानाच संपूर्ण जगासाठी आश्चर्यकारक आणि तितकीच आनंदाची बातमी आहे. वैज्ञानिकांना एक असा ग्रह सापडला आहे जो संपूर्ण सोन्याचा बनलेला आहे. होय, जर या ग्रहावरील सगळं सोनं पृथ्वीवर आणलं, तर सोन्याचे दागिने तुम्हाला रस्त्यावर विकले जाताना दिसतील. चला तर मग पाहूया हा ग्रह नेमका कोणता आहे आणि या ग्रहावरचं सोनं पृथ्वीवर आणता येईल का?

या ग्रहाचं नाव 16 Psyche (साईकी) असं आहे. त्याचा शोध इटलीतील खगोलशास्त्रज्ञ अनिबेले डी गॅसपेरिस यांनी लावला. हा ग्रह पृथ्वीपासून सुमारे 50 लाख किलोमीटर अंतरावर आहे. हा संपूर्ण ग्रह सोनं, प्लॅटिनम, लोह आणि निकेल यांसारख्या मौल्यवान धातूंनी बनलेला आहे. म्हणजे पृथ्वीवर जसे दगड-मातीचे डोंगर आहेत, तसं या ग्रहावर सोनं आणि प्लॅटिनमचे अक्षरशः डोंगर आहेत. त्यामुळे हा ग्रह सोनेरी रंगाने चमकताना दिसतो. या ग्रहाचा व्यास सुमारे 226 किलोमीटर आहे. यावरून या ग्रहावर किती सोनं असेल याची कल्पना करता येईल.

विचार करा जर या संपूर्ण ग्रहावरचं सोनं पृथ्वीवर आणलं, तर त्याची किंमत किती असेल? सोन्याची मागणी जास्त आणि उपलब्धता कमी त्यामुळे सोन्याच्या दरात तेजी आहे. पण जर या ग्रहावरून सोनं पृथ्वीवर आणलं, तर सोनं सर्वत्र उपलब्ध होईल. त्यामुळे त्याची किंमत हळूहळू कमी होईल आणि एक दिवस असा येईल की सोन्याचे दागिने रस्त्यावर विकले जातील.

ही शक्यता असतानाच दुसरीकडे वाळवंट असलेल्या राजस्थानमध्येही सोनच सोन आहे. कारण राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यात पुन्हा एकदा सोन्याचा खजिना सापडला आहे. कांकरिया गावातील सोन्याच्या खाणीस अधिकृत मंजुरी मिळाली आहे.

कांकरीया गावातील तीन किलोमीटरच्या क्षेत्रात सुमारे 222 टन सोनं असल्याचा अंदाज भूवैज्ञानिकांनी वर्तवला आहे. या खाणीतून लवकरच सोने काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. बांसवाडा जिल्हातील ही तिसरी सोन्याची खाण आहे. त्यामुळे बांसवाडा जिल्हा भारतात ‘सोन्याचा गड’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. देशातील सोन्याची 25% टक्के मागणी बांसवाडा जिल्हा पूर्ण करु शकणार आहे.

भारतीयांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यापूर्वी ओडीशा आणि मध्यप्रदेशमधील जबलपूरमध्ये सोन्याच्या खाणीचा शोध लागलाय. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, जगभरातील महिलांमध्ये भारतीय महिलांकडे सर्वाधिक सोने आहे. ज्याचे प्रमाण सुमारे २४ हजार टन आहे. एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता. आता तशी स्थिती पुन्हा यावी आणि सोनं सर्वांच्याच अवाक्यात यावं हीच अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : ठाकरे गटाच्या आमदाराच्या जवळच्या सहकाऱ्याचा धिंगाणा, कारमधून फोडले २८८ फटाके, VIDEO

Shocking : आशियाई खेळात भारताचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने आयुष्य संपवलं, क्रीडा विश्वात खळबळ

भारताविरोधात चीन्यांची नवा डाव? पेंगाँग जवळ चीनचा हवाई तळ?

Shocking : कॉलेजला जाताना अडवलं; भररस्त्यात तरुणीवर तरुणाकडून अॅसिड हल्ला, राजधानीत खळबळ

Vitamins: जास्त व्हिटॅमिन्सही बरं नव्हं! अति सेवनाने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT