जुन महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याच्या दरानं उच्चांकी गाठली आहे. महिन्याच्या सुरूवातीलाच दर वाढल्यामुळे पुढे देखील सोन्याच्या दरात वाढ होणार का? सोनं १ लाखांवर पोहोचणार का? असा प्रश्न आता ग्राहकांना पडला आहे. सोन्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे ग्राहक देखील सराफाच्या दुकानाकडे पाठ फिरवत असल्याचं चित्र आहे. अशातच आजही सोन्याचा भाव हा चढताच राहिलेला आहे. दरम्यान आजचा सोन्याचा दर किती पाहुयात.
मंगळावार ३ जून रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये १० ग्रॅम सोन्याचा दर ९९,००० रूपयांवर गेला आहे. दिल्लीत २२ आणि २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ६०० रूपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ९०, ८५० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ९९,०६० रूपये प्रति १० ग्रॅम आहे. तर, मुंबईत प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ९०,८०० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ९९,०६० रूपयांवर पोहोचला आहे.
सोनं का महागले?
जगभरात राजकीय आणि व्यापारी तणाव वाढत असल्याने सोमवारी सोन्याच्या किमती वाढल्या आहे. डॉलरची किंमत घसरली आहे. यामुळे सोने खरेदी करणे अधिक फायदेशीर झाले आहे. या कारणांमुळे सोन्याची मागणी वाढली आहे. यामुळे सोन्याच्या किमतीतही वाढ झाली आहे.
चांदीच्या दरातही वाढ
सोन्याच्या दरात होणाऱ्या वाढीसह चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. मंगळवार ३ जून रोजी चांदीचा भाव १,००,१०० रूपयांवर पोहोचला आहे. कालच्या तुलनेत त्यात १०० रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.
सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?
२४ कॅरेट सोने नेहमीच त्याच्या शुद्धतेमुळे प्रिमियम खरेदीदारांची पहिली पंसती राहिली आहे. दुसरीकडे २२ कॅरेट सोनं मजबूत आणि दागिन्यांसाठी सर्वोत्तम मानले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती, कर आणि रूपयाच्या मुल्यातील चढउतार अशा अनेक कारणांमुळे भारतात सोन्याची किंमत बदलते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.