Shocking Crime: गोठ्यातील जनावरांनाही सोडलं नाही, नराधमानं नको ते कृत्य केलं; अश्लील VIDEO व्हायरल

Man caught committing obscene act: नागपूरनंतर आता अकोल्यातही माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने गोठ्यात बांधलेल्या जनावरांसोबत अश्लील कृत्य केल्याची संतापजनक बाब उघडकीस आली आहे.
 Crime
Crimesamm tv
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही

नागपूरनंतर आता अकोल्यातही माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोट फैल भागातील अण्णाभाऊ साठे नगर येथे एका ५० वर्षीय नराधमाने गोठ्यात बांधलेल्या जनावरांसोबत अश्लील आणि अमानवी कृत्य केल्याची संतापजनक बाब उघडकीस आली आहे. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

ही धक्कादायक घटना अकोल्यातील अकोट फैल भागातील अण्णाभाऊ साठे नगर येथे घडली. आरोपीचे नाव सुभाष काशीराम श्रीवास (वय ५०) असे असून, त्याने पाळीव जनावरांसोबत अत्यंत विकृत आणि गैरकृत्य केलं आहे. आरोपीने गोठ्यात बांधलेल्या जनावरांसोबत अश्लील कृत्य केलं आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

 Crime
Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो? फॉरेन्सिक तपासातून सत्य बाहेर येणार

संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर बजरंग दलाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आकोट फैल पोलिसांनी त्वरीत तपास सुरू करत आरोपी सुभाष श्रीवास याला रात्री उशिरा ताब्यात घेतलं.

 Crime
Crime Shocking: 'महिला आहेत, लघुशंका करू नका' तिघांना राग अनावर, हॉटेल व्यवसायिकाच्या मुलावर गोळ्या झाडल्या

पोलीस तपास सुरु

हा व्हिडिओ व्हायरल होताच आरोपी पसार झाला होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपीविरोधात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी समाजमाध्यमांवर अशा प्रकारचे व्हिडिओ फॉरवर्ड न करण्याचं आवाहन करत, तपासात सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com