LPG consumers can complete e-KYC and Aadhaar verification by August 31, 2026. AI Image
बिझनेस

Gas Cylinder Update : LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ३१ ऑगस्टपर्यंत 'हे' एक काम न केल्यास सिलिंडर मिळणार नाही

LPG Gas Cylinder Update News : LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! e-KYC आणि आधार व्हेरिफिकेशनची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ऑनलाइन e-KYC कशी करायची आणि प्रक्रिया न केल्यास काय होऊ शकते, जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • LPG e-KYC आणि आधार व्हेरिफिकेशनची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवली

  • यापूर्वी अंतिम तारीख १६ ऑगस्ट, त्यानंतर २३ ऑगस्ट करण्यात आली

  • e-KYC पूर्ण न केल्यास LPG बुकिंग, सब्सिडी किंवा सिलिंडर सेवेवर परिणाम

  • केवळ e-KYC न केल्यामुळे लगेच LPG कनेक्शन रद्द होणार नाही

घरगुती LPG सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी. सरकारी तेल कंपन्यांनी LPG कनेक्शनसाठी e-KYC आणि आधार व्हेरिफिकेशनची अंतिम मुदत पुन्हा वाढवली आहे. आता ग्राहकांना ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ई -केवायसी पूर्ण करता येणार आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप ही प्रक्रिया केलेली नाही, त्यांना कंपन्यांकडून मेसेजद्वारे ई -केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान असे न केल्यास घरगुती सिलेंडर मिळण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.

घरगुती LPG सिलिंडरचे कनेक्शनसाठी ई -केवायसी करणे महत्त्वाचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार या ई -केवायसीची मुदत दुसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी आधार व्हेरिफिकेशनसाठी १६ ऑगस्ट ही अंतिम तारीख होती. मात्र त्यानंतर ती वाढवून २३ ऑगस्ट करण्यात आली होती. आता पुन्हा मुदत वाढवून ३१ ऑगस्ट करण्यात आली आहे. त्यामुळे ३१ तारखेपूर्वी हे काम न केल्यास तुमच्या घरी सिलिंडरची सेवा पोहोचणे कठीण होऊ शकते.

e-KYC न केल्यास काय होऊ शकते?

ठरलेल्या मुदतीपर्यंत ई -केवायसी पूर्ण न केल्यास ग्राहकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात विकला जाणारा LPG सिलेंडरचा लाभ तात्पुरता थांबवला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत ई -केवायसी पूर्ण होईपर्यंत ग्राहकांना सिलेंडर कमर्शियल दराने घ्यावा लागू शकतो. हा दर घरगुती LPG सिलेंडरच्या तुलनेत अधिक असतो. याशिवाय काही ग्राहकांची सिलेंडर बुकिंग प्रक्रिया थांबू शकते. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणारी सब्सिडीही बंद होण्याची शक्यता आहे. हा नियम जुन्या तसेच नवीन LPG ग्राहकांसाठी लागू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, केवळ ई -केवायसी न केल्यामुळे लगेच LPG कनेक्शन रद्द होणार नाही. दीर्घकाळ प्रक्रिया पूर्ण न केल्यास कनेक्शन ब्लॉक होण्याची शक्यता आहे.

मोबाइलवरूनही करता येते e-KYC

ग्राहकांना ई -केवायसी करण्यासाठी गॅस एजन्सीत जाण्याची गरज नाही. ही प्रक्रिया ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येते. मोबाइलवरून ई -केवायसी करण्यासाठी तुम्ही वापरत असलेल्या LPG कंपनीचे अधिकृत अॅप डाउनलोड करा. इंडेन, HP गॅस किंवा भारत गॅस यांच्या अॅपमध्ये ई -केवायसीचा पर्याय उपलब्ध असतो. संबंधित पर्याय निवडून आवश्यक माहिती आणि आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करता येते. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता ग्राहकांनी ३१ ऑगस्टपूर्वी ई -केवायसी पूर्ण करून घेणे फायदेशीर ठरेल. यामुळे भविष्यात सिलेंडर बुकिंग, सब्सिडीचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी टाळता येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विकेंडला जास्त झोपून आठवडाभराची झोप भरून निघते का?

भाजपच्या दिग्गज युवा नेत्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या बैठकी दरम्यान राडा

Blood Sugar :डायबिटीज नसतानाही वाढू शकते ब्लड शुगर! रोजच्या ‘या’ 7 सवयी ठरतात कारणीभूत

दिशा सालियनचे वडील वकिलांसह मातोश्रीवर दाखल; शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा; हायव्होल्टेज ड्रामा|VIDEO

SCROLL FOR NEXT