कार खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. कार खरेदी केल्यानंतर त्या कारला व्हिआयपी नंबर मिळावा, असे अनेकांना वाटत असतं. परंतु अनेकदा व्हिआयपी नंबर मिळण्यासाठी खूप वेळ वाट पाहावी लागते. त्याचसोबत व्हिआयपी नंबर मिळवण्यासाठीही तुम्हाला अनेकदा आरटीओला फेऱ्या घालाव्या लागत असे. परंतु आता तुम्ही ऑनलाइन पद्धतीने व्हिआयपी नंबरसाठी रजिस्ट्रेशन करु शकणार आहात. (Car VIP Number Registration)
तुम्ही नवीन एसयूव्ही, कार किंवा बाइकच्या व्हिआयपी नंबरसाठी ऑनलाइन पद्धथीने रजिस्ट्रेशन करु शकतात. तुम्ही परिवहन या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करु शकतात. रजिस्ट्रेशनसोबतच तुम्हाला ऑनलाइन पेमेंटदेखील करता येणार आहे.
याआधी तुम्हाला कारसाठी व्हिआयपी नंबर घ्यायचा असेल तर आरटीओच्या ऑफिसरला जावे लागायचे. परंतु आता तुम्ही घरबसल्या रजिस्ट्रेशन ककु शकणार आहे. यासाठी तुम्हाला परिवहनच्या वेबसाइटवर जावे लागणार आहे. (VIP Number Registration)
परिवहनच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला सर्वप्रथम ई-मेल, मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा नंबर निवडायचा आहे. यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे शुल्क किती भरायचे याची माहिती मिळणार आहे.(VIP Number Registration Online)
यानंतर तुम्ही पेमेंट केल्यावर तुम्हाला व्हिआयपी नंबर मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या कार डीलरशी बोलून हा नंबर घेऊ शकता.तुम्ही जेव्हा नंबर बुक करता तेव्हा तो आरटीओ सीरीजमघ्ये असणे आवश्यक आहे. जर तुम्ही तो नंबर बुक केला तर तो नंबर इतर कोणालाही मिळणार नाही. जो व्यक्ती पहिला येईल आणि त्याला नंबर हवा असेल आणि त्याने रजिस्ट्रेशन केले तर त्यांना हा नंबर तुम्हाला दिला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.